पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड
पुणे :- दि. ३१/०१/२०२३ रोजी श्री मनोज खंडाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षकगुन्हे शाखा युनिट ५ पिं.चिं. तसेच पोलीस उप-निरीक्षक श्री कोळी, सपोफो किरनाळे, पोहवा ७१८ बनसुडे, पोहवा. ८५८ राठोड, पोहवा १००९ ठाकरे, पो.शि. १३०५ खेडकर, पोशि ४९९ माने, पोशि २५७१ गुट्टे असे मिळुन गा. वरिष्ठांच्या आदेशान्वये अवैध शस्त्र बाळगणा-या विरुध्द कारवाईच्या अनुषंगाने लॅपटॉप व इतर जप्तीसाठी लागणारे साहीत्य घेवुन खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असतांना साना चौक, देहुरोड येथे आले असता पोहवा ७१८ बनसुडे व पोशि १८९८ गाडेकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, देहुरोड बाजार गणपती मंदीरा जवळ चार ते पाच इसम कोयता व तलवारी सारखी लोखंडी हत्यारे हातात घेवुन लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत अशी माहिती मिळताच वरील पोलीस स्टाफ असे पेट्रोलींग करत असलेल्या खाजगी वाहनाने सदर ठिकाणी गेले असता पोलीस पथकास पाहुन काही इसम तेथुन अंधाराच्या दिशेने पळून जावु लागले असता पोलीस पथकास त्याचा संशय आल्याने पोलीस पथकाने आरोपी नामे १) अल्ताफ अस्लम रंगरेज वय २२ वर्षे, रा. आंबेडकर नगर देहुरोड ता. हेवली जि. पुणे २) जैद रशिद खान वय १८ वर्षे रा. शितळानगर नंबर १ शितळादेवी मंदीराच्या पाठिमागे देहुरोड ता. हवेली जि. पुणे व इतर तिन विधीसंघर्षीत बालकांना शिताफिने ताब्यात घेवुन सदर इसमांना आहे त्या स्थितीत ठेवुन सपोको किरनाळे यांनी त्यांची एकापाठोपाठ एक अशी पंचासमक्ष झडती घेतली असता दोन लोखंडी कोयते, दोन लोखंडी तलवारी व एक गुप्ती वरील आरोपी व विधसंघर्षित बालक यांच्या कब्जात मिळुन आल्याने ती सपोफी किरनाळे यांनी पंचा समक्ष जप्त केले आहेत.तरी आरोपी नामे १) अल्ताफ अस्लम रंगरेज वय २२ वर्षे धंदा भाजी विक्री रा. आंबेडकर नगर देहुरोड ता.हवेली जि. पुणे २) जैद रशिद खान वय १८ वर्षे रा. शितळानगर नंबर १ शितळादेवी मंदीराच्या पाठिमागे देहुरोड ता. हवेली जि. पुणे व तिन विधीसंघर्षीत बालक हे आपले कब्जात वरील वर्णनाची हत्यारे अनाधिकाराने, विनापरवाना बेकायदेशीर जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत करित असताना मिळुन आले असुन त्यांनी मा. पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांचे कार्यालयीन पोलीस नोटीस सोमवार दि. २३/०१/२०२३ भाग-१ पान नं. १५० ते १५१ परि-१५ विशेष शाखा अन्वये दि. २४/०१/२०२३ रोजीचे ००.०५ चा. ते दि. ०६/०२/२०२३ रोजीचे २४.०० वा दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) वे उल्लंघन केले म्हणून त्याच्याविरुद्ध देहुरोड पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) महा पो का क. ३०७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. सह. पोलीस आयुक्त श्री मनोज लोहिया, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री प्रशांत अमृतकर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोज खंडाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळी, सपोफी किरनाळे, पोहवा ७१८ बनसुडे, पोहवा ८५८ राठोड पोहवा १००९ ठाकरे, पोशि १३०५ खेडकर, पोशि ४९९ माने, पोशि १८९८ गाडेकर व पोशि २५७१ गुट्टे यांनी केली आहे.