संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातील सर्व सामान्य नागरिकांना अनेक अपेक्षा होत्या. विशेषतः बेरोजगारी, महागाई, व सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या अन्य समस्या सोडविण्यासाठी या बजेट मधून तरतुदी होईल अशी अपेक्षा होती मात्र या सरकारने सर्व सामान्यांच्या अपेक्षांचा पदरी निराशा पडली आहे. निवडणूकीचे वर्षे लक्षात घेता केवळ लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या आधी या सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या त्यांचे काय झाले ते कळायला मार्ग नाही. या बजेट मध्ये महाराष्ट्राला ही फारशी मदत होईल असे दिसत नाही.

