✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.1फेब्र:- वर्धा जिल्ह्यात अवैध नार्कोटीक्स व्यवसायावर आळा बसविण्यासाठी पोलीस
अधिक्षक नुरूल हसन यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या
अखत्यारीत नार्कोटीक सेल पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
दिनांक 30 जानेवारी रोजी नार्कोटीक सेल उपविभाग हिंगणघाट यांना गोपनीय माहीती मिळाली की, शिवनगर ता. सेलु येथून पुजा मोहीते नावाची महीला व आकाश मोहीते असे दोघेही काळया रंगाचे यामाहा मोटार सायकलने जाम येथील हेमा हमद रा जाम हिला गांजा विक्री करण्याकरीता जाम चौरस्ता जवळ असणाऱ्या नव्या नावाचे पानठेल्या समोर रात्री 09.00 वाजताच्या सुमारास येणार आहेत. सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, पोलीस उप निरीक्षक खोत, पो.हवा . अरविंद येणुरकर, पो.ना. नितीन ताराचंदी, पो.ना. रवि पुरोहीत, मपोना .प्रांजली, पो. शि .आलोक हनवते, व पो.शि वैभव चरडे, यांनी संशय येणार नाही अशाप्रकारे साध्या वेशात सदर ठिकाणी पोलीसानी सापळा रचून आरोपीं महिल आणि तरुणाला अटक केले. आरोपी नामे पुजा हरीश मोहीते वय 30 वर्षे रा. समता नगर, सेवाग्राम ता. जि. वर्धा, आरोपी आकाश मोहीते रा. समता नगर सेवाग्राम, हेमा प्रमोद हमद वय 36 वर्षे रा. जाम ता समुद्रपुर जि वर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तेथुन पलीकडील शिवाराचे दिशेने अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला.