पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे :- स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. २५८/२०१२ भा.द.वि कलम ३७५ ३४ मधील
फिर्यादी हे दि. १०/१२/२०२२ रोजी १८/३० वा ते १९/०० चा सुमारास आळंदी. पी. एम. पी. एल बस स्टॉप स्वारगेट येथून लाळंदी बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या डाव्या हातातील दीड तोळे वजनाची सोन्याची बांगडी फिर्यादीच्या समतीशिवाय लबाडीच्या इरायाने चोरुन नेलेबाबत तक्रार दिल्याने
वर नमूद गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेला मालाचा व अज्ञात चोरट्याचा हद्दीमध्ये शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवा गायकवाड, अनिस शेख व फिरोज शेख यांना त्यांचे बातमीदार मार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील संशयित महिला आरोपी व एक मुलगी त्यापैकी महिलेने लाल रंगांची साडी व मुलीने काळ्या पांढऱ्या रंगांचा टॉप परिधान केलेली अशा वर्णनाची स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे संशयितरित्या फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने आम्ही कायदेशीर कारवाई करणेबाबत तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांना यांना आदेशित केल्याने सदर पथकाने स्वारगेट एसटी स्टैन्ड येथे जावुन सापळा लावुन थांबले असता लाल रंगांची साडी परिधान केलेली महिला व लिये सोबत एक काळया पांढया रंगांचा टॉप परिधान केलेली मुलगी संशयितरित्या फिरत असल्याचे दिसुन आल्याने वरील पथकाने सदर महिला व मुलीस ताब्यात घेवुन त्यांना त्याचा नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) महिला नाम आकालाई राजा काळे वय ६० वर्षे रा. निरावागज रोड बारामती जवळ ता. बारामती जि. पुणे २) मुलगी नामे सोनाली राजा काळे वय १८ वर्ष रा सदर असे असल्याचे सांगितले त्याचे कडे दाखल गुन्हयाचा तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केलेबाबा कबुली दिल्याने त्यांना अटक करुन त्यांचेकडे अधिक तपास केला असता सदर आरोपीतांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने त्यांच्या ओळखीचा इसम नामे दीलशा रामा पवार वय ५० वर्षे रा.मु. पो. सोमेश्वरनगर ता. आटपाडी जि.सांगली याला विक्री करणेकामी दिले असल्याचे सांगितल्याने सदर इसमास आटपाडी येथे पथक पाठवून तेथुन ताब्यात घेवुन त्यास दाखल गुन्हयात अटक करून त्याचेकडे तपास केला असता त्याने दिलेल्या निवेदनाप्रमाणे सांगोला येथील सोनार दुकानादारांना चोरीचा माल विकल्याचे सांगितल्याने सदर सोनार दुकानदारांकडे तपास केला असता त्यांना आरोपीने विकलेला मुद्देमाल पोलीस ठाणे येथे हजर केल्याने तो जाती पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. सुंदर अटक आरोपीताकडे तपास करीत असताना तपासा दरम्यान सदर आरोपीतानी स्वारगेट
पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले एकुण ११ गुन्हयातील चोरीस गेलेला एकुण ११० ग्रॅम (११ तोळे)वजनाचे एकुण ६,६०,०००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करून स्वारगेट पोलीस
स्टेशन येथे दाखल असलेले एकुण १५ गुन्हे उघड केले आहेत ते पुढीलप्रमाणे- (३) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं १९४/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे (१५) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं – २००/ २०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे ६) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं २०७/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे – १) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं १७/२०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे (१०) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं २०१ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे (११) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं २६६/२०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
१) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं २५८ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे २) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं १३९ / २०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
४) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं १९५/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
(७) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं ९९/२०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
८) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं ७८ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
सदरची कामगिरी ही मा. श्री. राजेंद्र डहाळे सो, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विनाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील सो. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२ पुणे शहर, मा. श्रीमती सुषमा चव्हाण सो सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, व पोहवा २२२१ मुकुंद तारु, पो/ ८२३९ सोमनाथ कांबळे, पो/ १००१६ शिवा गायकवाड, पो/ अ १००६२ फिरोज शेख, पो/ ९८२० अनिस शेख, पो/अ १००६८ रमेश चव्हाण, पो/अ ३५४१ प्रविण गोडसे, पों/अ ९८७३ किरण भरगुडे, पो/र्ज १०१४७ संदीप घुले, पो/ १९६३ दिपक खंदाड, म. पो/ हवा ६०३४ आकांक्षा आठवले म पो १०९२२ छाया गायकवाड यांनी एकत्र मिळून केली आहे.

