✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा : देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण आहे. आणि कधी कधी त्याची प्रचिती येते. आणि मग त्या असहाय निराधार कुटुंबासाठी एक देवदूत धावून आला. अन तिच्या जीवनातील अंधार थोडासा दूर झाला.
घटना अशी आहे की छत्तीसगड येथून रोजगार साठी एक आदिवासी कुटुंब सुदूर महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील एका टोकावरील सावली (वाघ) येथे पोटाची भूक भागविण्यासाठी कुटुंब कबिल्या सह आले. पती, पत्नी व एक मुलगी एवढंच छोटंसं त्याच कुटुंब. काही दिवशापूर्वी त्या परिवारातील 15 वर्षाच्या मुलीची प्रकृती बिघडली. सेवाग्राम येथे त्या मुलीला भरती करण्यात आलं. 28 दिवसांनंतर तिला हॉस्पिटलमधून सुट्टी झाली. पण एक भयाण अंधार त्या कुटुंबासमोर दाटून आला. कारण हॉस्पिटलचे गलेलठ्ठ बिल त्यांना वाकुल्या दाखवीत होते. जवळपास एक लाख तेरा हजार एकशे पंचेचाळीस रुपये एवढे अवाढव्य बिल पाहून त्या गरीब कुटुंबाला दिवसा उजेडी तारे दिसायला लागले. घाबरलेल्या त्या कुटुंबाने गावातील गोलू माने, शाखा प्रमुख दीपक पावडे, यांचेशी संपर्क केला. व मदतीची मागणी केली. गोलू माने याने प्रहार सेवक रितेश गुडधे याचेशी बोलून रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांच्याशी संपर्क साधला. प्रकरण ऐकल्या नंतर गजुभाऊ ने कागदपत्रांची मागणी केली. परंतु परप्रांतातील असल्याने त्यांच्या कडे महाराष्ट्रातील रहिवाशी असल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नव्हते. अशा कठीण परिस्थितीत देवा सारखे गजुभाऊ त्या निराधार कुटुंबासाठी धावून आले. रुग्णालयाच्या मॅनेजमेंट सोबत त्यांनी चर्चा करून त्यांनी कुटुंबाची विदारक स्थिती समजावून सांगत कोणत्याही परिस्थितीत हे कुटुंब एवढी अवाढव्य रक्कम भरू शकत नाही हे समजावून सांगितले. यावर उपाय काय? अशा बिकट स्थितीत मॅनेजमेंटचे वरिष्ठ अधिकारी यांनी संपूर्ण परिस्थिती तपासून पहात संपूर्ण बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि गजुभाऊ कुबडे यांना रुग्णमित्र का म्हणतात ? यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
परक्या प्रांतातील गरीब निराधार कुटुंबातली एकुलती एक मुलगी. गंभीर आजारी जवळपास ओळखीचे कोणी नाही. अशा बिकट परिस्थितीत गजू कुबडे सारखा देवमाणूस देवा सारखा त्या कुटुंबाला जाणवला असेल तर नवल नाही.
म्हणूनच आपले संत लिहून जातात, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348