विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहता दि.2:- आज राहता तालुक्या मध्ये प्रथमच साहिल म्युझिक हाऊस आणि फोटोग्राफी स्टुडिओ अकॅडमीचे ओपिंग करण्यात आले आहे.
या अकॅडमी मध्ये प्रशिक्षण फी 5000 आहे. या ठिकाणी पियानो, कीबोर्ड, गिटार, तबला, ऑटो पॅडसह इतर वाद्य देखील शिकण्याचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यासह फोटोग्राफी कोर्स विशेष काही वैशिष्ट्ये. एक्सपोजर ट्रॅगल, रचना, मीटरिंग मोड, केल्विन -व्हाईट बॅलन्स, 3 रानियम, प्रोफेशनल फोटोग्राफी मधील बरेच काही. या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येईल असे संस्थापक यांनी सांगितले आहे.
या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घानप्रसंगी प्रमुख पाहुणे आर. पी. आय शाखेचे युवा जिल्हा नेते पप्पूभाऊ बनसोडे यांच्या हातचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी गणू भाऊ निकाळजे, संतोष बनसोडे, तुपे साहेब, इतर कार्यकर्ते हजर होते. तसेच राहता तालुका पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष रेव्ह. विलास ब्राह्मणे, उपाध्यक्ष. संतोष वाघमारे, मिलिंद धिवर, योसेफथोबे,अमोल खरात, दीपक बल्लाल, दत्तू पेटारे, अमोस वाघमारे, शेयम उमाप्ती, सि. संगीता त्रिभुवन व इतर धर्मगुरू उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

