निखिल पिदूरकर, कोरपना तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वेंडली:- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय वेंडली येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सव कलागुणांचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोतरावजी काकडे अध्यक्ष, सावित्रीबाई फुले बहू. शिक्षण व प्रशिक्षण संस्था भोयगाव तथा माजी मुख्याध्यापक राजेंद्र विद्यालय भोयगाव यांची उपस्थिती होते. उदघाटक म्हणून सौ.प्रतिभा अलवलवार (सरपंच) या प्रसंगी प्रमुख अतिथी राजकुमार नागपुरे उपसरपंच, सौ.इंदूमती काकडे, कैलाश चिवंडे, सौ. प्रणाली घुगुल, भूषण घुगुल, सौ. संध्या पिंपळशेंडे, श्रीरंग वरारकर, बबन पा. पाचभाई, प्रभाकर पाचभाई, प्रकाश अलवलवार, अरुण मासिरकर, मुख्याध्यापक श्रीकांत पिंपळशेंडे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत पिंपळशेंडे यांनी शाळेत दरवर्षी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात येते. यावेळी शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रगतीचा अहवालाचे वाचन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कला दाखवण्याचे व्यासपीठ म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन असते. मुलांनी जीवनात कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात खूप मेहनत करून प्रगती साधावी असे विचार अध्यक्ष भाषणातून काकडे साहेब यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रूपाली तोडासे मॅडम व कुमारी अर्चना काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ प्रांजली आवारी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी करता लिपिक श्री संदीप पिंपळशेंडे, श्रीकृष्ण पाचभाई, रुपेश चिवडे, निलेश जोगी व सचिन किनाके यांनी प्रयत्न केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

