✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये भाजपाच्या बालेकिल्ला ढासळला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गळकरी यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने सेंध लावले आहे. भाजपाच्या उमेदवारालाचा मोठ्या फरकाने पराभव केला.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकी साठी रविवारी मतदान झाले होते आज निकालाचा दिवस होता. आज सकाळी 8 वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीपूर्वी प्रमुख उमेदवार व नेत्यांनी विजयाबद्दल दावे केले होते. भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवतात, याकडे शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले होते. हॅट्ट्रीकपूर्वीच नागो गाणार यांची विकेट पडली आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी झाले आहेत.
नागपूर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी 86.26 टक्के मतदान झाले होते. 39 हजार 834 पैकी 34 हजार 359 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजनी येथील समुदाय भवनात सकाळी 8.00 वाजता पासून या मतमोजणीला सुरुवात झाली.
नागो गाणार यांचा झाला संदिप जोशी?
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकिसाठी भाजपने नागो गाणार यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडी तर्फे सुधाकर अडबोले यांना उमेदवारी दिली होती. पण यावेळी नागो गाणार यांचा पराभव झाला. त्यामुळे राजकिय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे. भाजपनेच नागो गाणार यांचा संदिप जोशी केल्याचे बोलले जात आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348