सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कलावंत विद्यार्थी भविष्यात देशातील नामवंत कलाकार होऊ शकतात: अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा.काँ
प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील हॉली क्रॉस स्कूल येथे सांस्कृतीक कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात वातावरणात आयोजन शाळेच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठं व्यासपीठ उपलब्ध होत असून कलावंत विद्यार्थी भविष्यात देशातील नामवंत कलाकार होऊ शकतात असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टिचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले.
यावेळी या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका बीना मैथ्यू मॅडम व संस्थेचे सचिव जेम्स सैमुअल, दशरथ ठाकरे, जनार्धनजी निखाडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिवप्रज्वलन व सरस्वतीच्या आणि नटराजच्या फोटोला माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्याचे स्वागत शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. तसेच शाळेच्या विद्यार्थानी मधुर संगीतानी कार्यक्रमाची सुरवात केली होती. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थाचा सहभाग होता. सर्वच विद्यार्थानी अप्रतिम नृत्य करत आपली कला सादर केली. विद्यार्थाच्या नृत्याचे प्रेक्षकांची मने जिंकली तसेच शाळेमध्ये झालेल्या वार्षिक क्रिडांगण स्पर्धेमध्ये विजेता विद्यार्थीना स्मृतिचिन्ह देवून त्याचे मनोबल वाढवले.
या कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या विदयार्थानी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षीका शगुफ्ता शेख यांनी केले. हा सांस्कृतीक कार्यक्रम पार पाडण्यासाठी हॉली क्रॉस स्कूल चे शिक्षक सचिन थारकर यांच्यासह सर्व शिक्षिका व विद्यार्थी यांचा मोठया प्रमाणात सहभाग होता. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीतानी करण्यात आली. यावेळी ए.एस.आर सुहानी तुमाने, अध्यक्षा सलोनी चहाकर, जी.एस दिशा पहाडे, संपूर्ण विद्यार्थी युनियन सोसायटी यांनी आयोजित केलेल्या हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348