श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात गुरुवारी रात्री आकाशात एक प्रकाशमान लांब असणारी प्रकाशमान वस्तू दिसली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या वस्तू बदल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता वाढली आहे.
एक संत गतीने स्वंयम प्रकाशीत हि वस्तू ७ वाजतच्या दरम्यान बीड जिल्ह्यातून दिसली आहे. मंद गतीने चालणारी हि प्रकाशमान वस्तू पाहून लोक अचंबित झाले आहेत. ह्या वस्तू कडे पाहिल्यास असे दिसुन येत आहे कि, सदर वस्तू मानव निर्मित नाही. एखाद्या लांब लचक काठी प्रमाणे हि प्रकाशमान वस्तू हळूवार आकाशातून प्रवास करत असल्याचे दिसले आहे.
तारा तुटणे, उल्कापात असे प्रकार काही नवे नाहीत आणि पंरतु हि बाब अचंबित करणारी आहे. यंत्र/याणा प्रमाणे सरळ दक्षिणेकडून उत्तरे कडे एका सरळ रेषेत स्थिर गतीने गेल्याचे दिसले आहे. हा प्रकार पाहून लोक अनेक तर्क वितर्क लावून बोलत आहेत.