पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०३/०२/२०२३ रोजी पोलीस अंमलदार हरिष मोरे व नागेशसिंग कुंवर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, गोविंदराज ऊर्फ गोविंद वाघमारे हा पी के वाईन शॉप समोर, पर्णकुटी चौकात उभा असुन त्याचे ताब्यात चोरीची अॅक्टिव्हा आहे. सदर माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखा युनिट ४ चे प्रभारी अधिकारी श्री गणेश माने यांनी अधिनस्थ पोलीस अधिकारी व अंगलदार यांचे पथक तयार करून सदर वाहन चोरास ताब्यात घेवुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.
गुन्हे शाखा युनिट ४, पुणे शहर कडील नेमलेले पथकाने तात्काळ बातमीचे ठिकाणी जावुन सापळा रचुन पाहनचौर आरोपी गोविंदराज ऊर्फ गोविंद माधवराव वाघमारे रा. सनसवाडी, बापु दरेकर बिल्डिंग, एच.पी. पेट्रोल पंपाचे समोर, ता. शिरूर, जि.पुणे मुळ रा. मु.पो. जांभळीगाव, ता. मुखेड, जि. नांदेड यास चोरीच्या अॅक्टिव्हासह ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीकडे गुन्हे शाखा युनिट ४ कडील पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून एकुण ६ गुन्हे उघडकीस आणले ते पुढीलप्रमाणे. १) पोलीस ठाणे येरवडा ९८ / २०२३, २) पोलीस ठाणे येरवडा ९९ / २०२३, ३) पोलीस ठाणे कोरेगाव पार्क ७९/ २०२२, ४) पोलीस ठाणे दिघी ३२२/२०२२, ५) पोलीस ठाणे निगडी ४०६ / २०२२, ६) पोलीस ठाणे लोणी काळभोर १०४ / २०२३ ताब्यातील आरोपीकडुन वर नमुद एकुण ६ गुन्ह्यामध्ये चोरी केलेली एकुण २,८०,०००/- रु. ची चाहने जप्त करण्यात आली आहेत. सदर आरोपीतास पुढील तपासकामी पोलीस ठाणे येरवडा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री संदीप कर्णीक, मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप-निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अमलदार महेंद्र पवार, नागेशसिंग कुंवर, हरिष मोरे, विनोद महाजन, रमेश राठोड, मनोज सांगळे, शितल शिदे यांनी केली आहे.

