विविध विषयांचे निवेदन देऊन ते पूर्ण करण्यासाठी सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला: अविनाश नवरखेले
✒️मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- वर्धा जिल्हातील सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे नेते, र्श्री. संत भिकाजी महाराज फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अविनाश नवरखेले यांनी नुकतीच मुंबई येथे वने, सांस्कृतिक आणि मत्सव्यवसाय मंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांची मंत्रालयात जाऊन भेट घेऊन यावेळी त्यांना विविध विषया संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली.
श्री. संत भिकाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने जिल्हाध्यक्ष अविनाश नवरखेले यांनी वारकरी व तुकडोजी संप्रदायातील भजनी कलावंताना मासिक 5000 मानधन देण्यात यावे. विदर्भातील सर्व जिल्हातील युवक युवती यांच्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमा करिता सन 2023 – 24 या वर्षाचे आर्थिक सहाय्य अनुदान देण्यात यावे. यासह विविध विषयाचे मागण्याचे निवेदन यावेळी त्यांनी दिले आणि त्यावर चर्चा केली.
यावेळी या निवेदनावर सांस्कृतिक आणि मत्सव्यवसाय मंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि लवकर आम्ही या मागण्या पूर्ण करणार असे आश्वासन दिले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348