डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- दिवसेंदिवस पत्रकाराची जबाबदारी वाढत आहे. विश्वासार्हता टिकवताना जबाबदारीचे देखील भान पत्रकारानी ठेवले पाहिजे. याकारीता पत्रकारांना कायदेशीर ज्ञान घेणे आवश्यक आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करू नये. असे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केली.
अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे हे पुण्यातील पोलीस रिसर्च सेंटर (CPR) येथे सोमवार (ता. ६) रोजी पत्रकारांसाठी एक दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पुण्याच्या अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले. याप्रसंगी ॲडव्होकेट मिलिंद दातरंगे, ॲडव्होकेट गीता गोडांबे, सायबर तज्ञ संदीप गादीया सहाय्य पोलीस आयुक्त (निवृत्त )संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलिस आणि पत्रकार यांचे घनिष्ट संबंध निर्माण होण्यासाठी या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कायद्याचे मूलभूत हक्क,व अधिकार ,महिला आणि बाल गुन्हेगारी, सायबर क्राईम, न्यायप्रक्रिया आणि महत्त्वाचे निकाल अशा विविध विषयावर तज्ञांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारनी विचारलेले प्रश्न आणि शंकांचे निराकरण तज्ञांनी केले.
यावेळी ॲडव्होकेट दातरंगे म्हणाले की पत्रकारांनी कायदे, न्यायव्यवस्था याचा अभ्यास केला पाहिजे. न्यायव्यवस्था कशी चालते हे पाहिले पाहिजे. न्यायकालीन प्रक्रिया काय आहे हे समजून घेतले पाहिजे. कायद्यासमोर सर्व समान आहेत .भारतीय राज्यघटनेशी संबंधित कायदे असावेत विसंगत नको. महिला आणि बाल गुन्हेगारी याविषयी बोलताना ॲडव्होकेट गोडंबे म्हणाले, की कौटुंबिक हिंसा (कलम 498) मुळे कुटुंबातील अनेक सदस्य अडकले जातात, संपूर्ण कुटुबांवर विपरीत परिणाम होत असतो. पत्रकारांनी बातमी करताना आरोपीला फोकस केले पाहिजे. पीडित कुटुंबाला नाही यामुळे समाजातील विकृती कमी होण्यास मदत होईल. डोमेस्टिक अॕक्ट नुसार पीडित महिलेला थेट न्यायालयाकडून दाद मागता येईल.
सायबर क्राईम बाबत माहिती देताना सायबर तज्ञ संदीप गादिया म्हणाले की, टेक्नॉलॉजीचा वापर करून गुन्हे केले जातात. आजूबाजूला अनेक तांत्रिक माध्यम आहेत जे तुमची फसवणूक कधी आणि कशी करते हे सांगता येत नाही. मोबाईल आपली ओळख आहे आपली ही ओळख चोरली जाते. डिजिटल फुट प्रिंट हा पुरावा आहे. त्यांनी जीवनातील प्रत्येक माहिती ही गोळा केली जात असते. त्यामुळे प्रत्येकाने सजगता बाळगणे आवश्यक आहे .छोट्या छोट्या चुका तुम्हाला गुन्हयात अडकवून शकतात.
यावेळी साहाय्यक पोलीस (निवृत्त) संभाजी पाटील म्हणाले की, पोलीस प्रमाणे प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. विविध कलमाची माहिती घेऊन प्रत्येक नागरिकास जबाबदार नागरिक म्हणून समाजामध्ये आपले कर्तव्य बजावू शकतो. पत्रकारिनी सत्य घटनांचे वृत्तांकन केले पाहिजे. बातमी लिहिताना पोलिसांची बदनामी होणार नाही. याबाबत सतर्क असले पाहिजे. पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.