नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अंबरनाथ:- अंबरनाथ पश्चिम येथील नगरपरिषदेची नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारत व नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या कामाची नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
शासनाच्या १४ व्या वित्त आयोगातून व वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून ही कामे मार्गी लावण्यात आली असून येत्या काही दिवसांत नगरपरिषदेची सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत व नाट्यगृह नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहे. तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून लोकलबोर्ड व शिवमंदिर येथे सी.बी.एस.ई. बोर्ड शाळा उभारण्यात येणार असून राज्यात नगरपरिषदेची सी.बी.एस.ई. बोर्डची शाळा सुरू करणारी अंबरनाथ नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरणार असल्याने याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना यावेळी दिल्या.
या पाहणी दरम्यान बाळासाहेबांची शिवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ, रविंद्र करंजुले, रवींद्र पाटील, तुळशीराम चौधरी, सुभाष साळुंके, अनंत कांबळे, युवासेना तालुका अधिकारी शैलेश भोईर, उपविभाग प्रमुख प्रल्हाद महाजन, व्यापारी संघटनेचे रुपसिंग धल, संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके तसेच नगरपरिषदेचे अधिकारी आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.