Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महाराष्ट्र: आई झाली पोटच्या मुलासाठी वैरणी.. आईनेच आपल्याच पोटच्या 2 मुलांची झोपेतच केली हत्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 7, 2023
in क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
महाराष्ट्र: आई झाली पोटच्या मुलासाठी वैरणी.. आईनेच आपल्याच पोटच्या 2 मुलांची झोपेतच केली हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन औरंगाबाद:- येथून एक आई मुलांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे. एका दरभाद्र्या आईने आपल्याच पोटच्या मुलांची गळा आवळून त्यांची निर्मम हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलांचा आईनं झोपेतच जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. औरंगाबादमधील सातारा पोलीसानी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये आईनंच आपल्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. हत्येचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन दोघे बहिण-भाऊ झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केल्यावर डॉक्टरांनी दोघा बहिण-भावाला मृत घोषीत केलं. अदीबा फहाद बसरावी, असं मृत 8 वर्षीय मुलीचं नाव आहे. तर अली बिन फहाद बसरावी, असं 4 वर्षीय मुलाचं नाव आहे.

पोलिसांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, मुलगी अदीबा आणि मुलगा अली रविवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवले आणि त्यानंतर आपल्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी दोघे खोलीतून बाहेरच आले नाहीत. त्यावेळी त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी गेली, त्यावेळी दोघेही बेशुद्ध असल्याचं आढळून आलं. कुटुंबीयांना दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिथे मुलांना मृत घोषीत केलं. मुलांचा मत्यू नेमका झाला कसा? याचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान होतं. अखेर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली. त्यावेळी दोन्ही मुलांच्या जन्मदात्या आईनंच रात्री मुलांची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र आईनं दोन्ही मुलांना नेमकं का मारलं? याचा मात्र उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. पोलीस तपासात, आरोपी आई मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे.

Previous Post

हिंगणा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला जनजागर यात्रा.

Next Post

बाळासाहेबांची शिवसेना व युवासेना चंद्रपूर जिल्हाच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बाळासाहेबांची शिवसेना व युवासेना चंद्रपूर जिल्हाच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध.

बाळासाहेबांची शिवसेना व युवासेना चंद्रपूर जिल्हाच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In