✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.7:- प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते आज सामाजिक न्याय भवन ते सेवाग्राम रेल्वेस्टेशन रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसरंक्षक पंचभाई, तहसिलदार रमेश कोळपे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक वैभव लहाने, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, मुख्याधिकारी राजेश भगत, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते, विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, वैद्यकीय मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, आदी उपस्थित होते.
यावेळी सयाजी शिंदे यांनी सामाजिक न्याय भवन ते सेवाग्राम रोडच्या कडेल वृक्षरोपण करुन सर्व मान्यवरांसह गायत्री मंत्राचा जप करुन वृक्षरोपण केल्यावर त्या वृक्षाच्या नावाने हात जोडून परमेश्वराकडे साकडे घातले व चांगभलचा गजर केला. तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत वृक्षसंवर्धनाबाबत चर्चा झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन पाटील उपस्थित होते.

