पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर.
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :-भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठांनी वाहन चोरांचा शोध घेणेबाबत तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता यांना आदेशीत केले होते. त्यानुसार मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार याचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अमलदार पोलीस स्टेशन हद्दीत बाहन चोरीचे गुन्हयांना आळा बसावा म्हणुन तपास पथकातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार चेतन गोरे, मितेश चोरमोले अभिनय चौधरी, अशिष गायकवाड असे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना अमृत खान, लिपाणे वस्ती येथे इसम नामे संदीप संपत आंधळे, वय २३ वर्षे, रा. सध्या रा. विघ्नहर्ता सोसायटी, मुलेनगर, मांजरी तु पुणे मुळ गाव मु पो लिंबोरी, ता आष्टी, जि. बीड हा एक एफ. झेड. दुचाकी गाडी, तिचा नंबर KA38EA0406 या गाडीसह मिळुन आल्याने त्यांचेकडे सदर गाडीबाबत तपास करता ती गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरंन ७६३ / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयामधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरची गाडी जप्त करून त्यंना नमुद गुन्हयात अटक केली आहे. अटके दरम्यान त्याचेकडे तपास करता त्याने ती गाडी महागडी असल्यामुळे शौक म्हणुन चालविण्यासाठी चोरी केली असल्याचे सांगितले आहे..
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा श्रीमती सुषमा चव्हाण सो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चौरमाले सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, आहे. धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली