सतीश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी
9765229010
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- भोकरदन येथे तालुका काँग्रेस कमिटी द्वारे शहरातील एसबीआय बँकेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी “या केंद्र सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय ” व “अदानीच्या गैरकारभाराची चौकशी झालीच पाहिजे ” अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आंदोलनावेळी म्हणाले अदानीच्या गैरकारभाराचा भंडाफोड झाला असुन तब्बल ७ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.हा पैसा सुरक्षित राहावा व गौतम अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी.