पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :-– खंडणी विरोधी पथक १ कडे बुधवार पेठ पुणे येथील कापड व्यापारी यांनी त्यांनी घेतलेल्या व्याजाची मुद्दल व व्याज परत करून ही ज्यादा दराने व्याजाची मागणी करीत असल्याचे तसेच ते न दिल्यास त्यांना व त्यांचे कुटुंबियाला मारहाण व शिवीगाळ करीत असल्याबाबतचा तक्रारी अर्ज चौकशीसाठी प्राप्त झाला होता..
सदर अर्ज चौकशीमध्ये इसम नामे १) रविंद्र कांबळे रा. पर्वती, पुणे व इतर २ इसम यांचे कडून ७,००,०००/- रुपये व्याजाने घेतले होते. त्यास बदल्यात सदर व्यापा-याने त्यांना एकूण १३,६२,०००/- रुपये मुद्दल व व्याजाचे पैसे देवून सुध्दा ते तिघेही आणखी १३,५०,०००/- रुपये ऐवढया व्याजाची मागणी करीत असल्याचे तसेच ते न दिल्यास व्यापा-याला व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे निष्पन्न झाले होते..
सदर बाबत इसम नामे १) रविंद्र कांबळे रा. पर्वती, पुणे व इतर २ इसम यांचे विरुध्द विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गु.र.नं. ४१/ २०२३ भादंवि कलम ३८४,३८६,५०४, ५०६, ३४ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ व ४५ अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्हयातील आरोपी नामे रविंद्र पिरप्पा कांबळे वय ३६ वर्षे, रा. घर नं. १०४१, बुधवार पेठ, पुणे यास ताब्यात घेवून पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त १ गुन्हे श्री. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सपोनि अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार मधुकर तुपसौंदर, हेमा ढेबे रविंद्र फुलपगारे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव अमर पवार व संभाजी गंगावणे यांनी केली आहे.

