मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इगतपुरी:- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा वतीने आयोजित राज्यस्तर शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा 2022-23 चे श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे 17 ते 19 फेब्रुवारी ला आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इगतपुरी तालक्यातील श्री. गोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव या शाळेत 10 व्या वर्गात शिकणाऱ्या पांडू दत्तू जुंदरे याने 71 कीलोवजनी गटाच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले.
इगतपुरी तालक्यातील पांडू दत्तू जुदरे या युवकाने राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धे मध्ये भाग घेवून एक उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या शालेय आणि तालुक्याचे नाव उंचवल मुळेले शाळेतील शिक्षक, आई वडील आणि नागरिकांनी सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

