राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- समाजात राहून समाजोपयोगी कार्य करण्याची प्रबळ ईच्छा ठेवून ते अमलात आणणारे व्यक्ति मोजकेच असतात, आणि त्याची दखल घेऊन, त्यांची प्रेरणा वाढवून, त्यांचे आभार म्हणून, तसेच समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व म्हणून योग्यवेळेस सत्कार झाल्यास गावाचा प्रगतीसाठी मोलाच योगदान ठरेल. यादृष्टिने भंगाराम तळोधीत नवयूवक मंडळाकडून अनेक महानुभावाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विवेकजी गोनपल्लीवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र ईमारत, भंगाराम तळोधी साठी जमिन दान करून विशेष सहकार्य केल्याबद्दल. व्यंकटेश नूलगोंडावार मेहनतीने PSI झाल्याबद्दल, महेश राऊतवार सैन्यात भरती होऊन देशाच रक्षक बनल्याबद्दल. तिरूपती पेशेट्टीवार शिक्षक श्रीनिवास राऊतवार बी ई सिव्हील भूमि अभिलेख कार्यालय जि प चंद्रपूर येथे कार्यरत. अभय सोनूले सीआरपी या सर्वांचे पुष्पगुच्छ, शिवाजी महाराजांचे प्रतिमा देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळेस मंचावर अध्यक्ष म्हणून अमर बोडलावार माजी जि.प.सदस्य चंद्रपूर, सौ लक्ष्मीताई बालूगवार सरपंच ग्राम पंचायत भंगाराम तळोधी, स्वप्नील माडूरवार, सूनिलभाऊ घाबर्डे उपसरपंच भंगाराम तळोधी,संजय गोविंदवार ग्राम तंमूस अध्यक्ष,गजूभाऊ पेदुलवार, सुनील, रामगोनवार ग्राम पंचायत सदस्य गीताताई बूर्रीवार, नम्रता बारसागडे,जयेश कारपेनवार, नरेश चालेल चेलमेलवार ,सूनिलभाऊ रामगोनवार माजी तंमूस अध्यक्ष, राकेश कटकमवार शाळा व्यवस्थापन स.अध्यक्ष,व मोठ्या संख्येत गावकरी उपस्थीत होते.

