तिरुपती नाल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा. दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी मौजा धानोरा ता. राजुरा येथील राजुरा-गोंडपिपरी सीमेवरील वर्धा नदीच्या तिरावर असलेल्या निसर्गरम्य शिवमंदिरात दरवर्षी प्रमाणे देवस्थान कमेटीच्या वतीने महाशिवरात्र प्रीत्यर्थ विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान कमेटी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी सेवाभावी पणे उत्कृष्ठ कार्य करणारे देवस्थान कमेटीचे अध्यक्ष उद्धव पा. बलकी, मंदिराला जमीन दान देणारे बंडू पा. पारखी, मंदीर परिसरात २ लक्ष रु.चे शेड उभारून देणारे विरुर येथील प्रतिष्ठीत व्यापारी पंकज चंद्रकांत उपलंचीवार यांचा व तसेच कमेटीचे सचिव संजय जेऊरकर, उपाध्यक्ष चंदू सावकार उपलंचीवार व भजन मंडळ अध्यक्ष यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी धानोरा ग्रा. पं. चे उपसरपंच घनशाम दोरखंडे, चिंचोली चे सरपंच पीलाजी पा. भोंगळे, भाजप पंचायत राज व ग्रामविकास आघाडी चे संयोजक प्रदिप बोबडे, सुधाकर चंदनखेडे गुरुजी, देवस्थान कमेटीचे अध्यक्ष उद्धव पाटील बलकी, उपाध्यक्ष चंदूजी उपलंचीवार, सचिव जेऊरकर, बंडुजी पारखी, पंकज उपलंचीवार, गजानन कोडगिरावर, भीमराव अंगलवार, संजय बल्की, व मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्धल माजी आमदार निमकर यांनी अपल्या मनोगतातून देवस्थान कमेटी व गावकऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जेऊरकर व आभार प्रदर्शन सचिन बल्की यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

