अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक च्या वतीने विविध मागण्या संदर्भात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सोमवार 20 फेब्रुवारी पासुन सावनेर पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेले सर्व लाभ मिळावे. मानधनात वाढ करावी. ग्रॅज्युएटी,अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर दर महा पेन्शन देण्यात यावी. अंगणवाडी सेविकांना नवीन कार्यक्षम मोबाईल देण्यात यावा. अशा विविध मागण्यांसाठी सोमवार पासुन सावनेर पंचायत समिती कार्यालयासमोर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी काम बंद धरणे आंदोलन पुकारले आहे.
तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी पंचायत समिती कार्यालयासमोर शासना विरोधात धरणे आंदोलन करीत मागण्याकरिता नारे बाजी केली .सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्षा कुंदा लांबट व सचिव चंद्रप्रभा लोधी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविकांना दरमहा 8300 रूपये,मिनी अंगणवाडी सेविकांना 5800 तर मदतनिसांना 4200 रूपये ऐवढे मासिक मानधन दिले जाते. आम्ही शासनाकडे मानधन वाढीसाठी वारंवार मागणी करून ही आमच्या मागणीकडे शासन लक्ष देत नाही. यापूर्वी शासनाकडून आम्हा मानधन वाढीचे आश्वासन दिले होते पण अद्यापही शासनाकडून आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. या तटपुंजी मानधनात कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे. शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करावे अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन असे सुरू राहणार असल्याचे सावनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्ष कुंदा लांबट व सचिव चंद्रप्रभा लोधी यांनी सांगितले. यावेळी ममता चवारे, सुशिला सहारे, प्रज्ञा डोंगरे, ज्योस्ना खोरगडे, सारिका बागडे, सुनिता पाटील, मीना आमटे, आम्रपाली गजभिये, पुष्पा भैसारे, निशा चोपकर, ज्योस्ना डोईफोडे, प्रमिला ठाकरे आदि शेकडो अंगणवाडी व मदतनिसां सेविकांची उपस्थिती होती.

