पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक २३/०५/२०२१ रोजी संध्याकाळी पुजा मार्केट जवळ, स्वामी समर्थनगर, साधे वस्ती, लोहगाव, पुणे येथे फिर्यादी राधानोरी पुणे हे त्यांचा मित्र शंभु व इतर मित्रांसह बोलत थांबलेले असताना, वार ते पाच दुचाकी वाहनावर आलेल्या १० ते १५ इसमांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी यांच्या रिक्षाचे नुकसान करुन फिर्यादी व त्यांचा मित्र शंभु यांना जिवे ठार मारण्याचं उद्देशाने धारदार हत्याराने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले होते तसेच भांडणाचे वेळी फिर्यादीस मदत करण्यात येणाऱ्या स्थानिक नागरीकांना हत्याराचा धाक दाखवुन वस्तीत दहशत करणारे आरोपीन विरुध्द विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं. १४४ / २०२१ मा.द.वि. कलम ३०७, १४३, १४७, १४८, ५०४, ५०६, ४२७ भारताचा हत्यार कायदा कलम ४/२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५.१४२ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट 1७ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता सदरचा गुन्हा केल्या पासुन त्यातील मुख्य आरोपी जमिर शेख हा फरार झालेला होता.
पुणे शहरात कसबा विधान सभा २०२३ अंतर्गत पोट निवडणुकीचा प्रचार चालु आहे. त्या प्रचाराचे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता युनिट-४ हद्दीत सतर्क गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करुन रेकॉर्ड वरिल सराईत गुन्हेगार, शस्त्र बाळगणारे पाहिजे व फरारी आरोपी यांचा शोध घेणे, अवैध धंदे करणारे यांना चेक करून मिळुन आल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक श्री गणेश माने यांनी दिले होते.प्राप्त आदेशा प्रमाणे सहायक पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस हवालदार संजय आढारी, पोलीस नाईक विनोद महाजन, पोलीस नाईक सानिल कांबळे असे युनिट ४ वे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक विनोद महाजन यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्हयातील फियादी याचेवर जिवघेणा हल्ला करुन पळुन गेलेला जमिर शेख हा नुरानी मशिद, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे येथे चिकन विक्रीच्या दुकानात कामास आलेला आहे.” अशी खात्रीशिर बातमी मिळाली. बातमी प्रमाणे खात्री करून आरोपी नामे जमिर रफिक शेख, वय २२ वर्षे, रा. जय प्रकाशनगर, येरवडा, पुणे यास युनिट ४ चे वरिल पथकाने शिताफिने ताब्यात घेतले. त्याचेकडे प्राथमिक तपास करता, तो विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं. १४४ / २०२१ हा दाखल गुन्हा केल्या पासून पुण्यातुन पळुन जाऊन कर्नाटक येथे वेषांतर व नाव बदलुन राहत होता. त्यानंतर काही दिवसांपासुन तो वैषांतर व नाव बदलुन पुण्यात येरवडा येथे लक्ष्मीनगर झोपडपट्टीत एका चिकनच्या दुकानात काम करुन तेथेच राहत होतो. तो दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कायदेशीर कारवाई करीता विमानतळ पोलीस ठाणेचे सान्यात देण्यात आले आहे. पुढील उपास विमानतळ पोलीस ठाणे करीत आहे..
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. अगोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ पुणे शहर श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस अंमलदार संजय आढारी, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे यांनी केली आहे.

