मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आलापल्ली:- आज राज्यात पत्रकाराच्या अनेक समस्या आहे. आज त्यांच्यावर हल्ले होत आहे. आज त्यात ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अनेक पत्रकार परिसरातील नागरिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्याला वाचा फोडण्याचे काम करत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हयातील पोर्टल ग्रुप पत्रकारांनी खासदार अशोक नेते यांची सद्धीछा भेट घेतली. यावेळी विविध मुद्द्यावर यांच्या सबोत चर्चा करण्यात आली.
आलापल्ली विश्रामगृहात खासदार अशोक नेते यांच्यासोबत पोर्टल ग्रुप पत्रकारांसोबत सदिच्छा भेट दिली. यावेळी पत्रकार जावेदअली, पत्रकार किशोर उसेंडी, पत्रकार व्यंकटेश चालूरकर, पत्रकार श्रीनिवास बंडमवार, पत्रकार मधुकर गोंगले, पत्रकार सुरेश मुतकुरवार, रोशन योगलपवार, अशोक नामनवार, एजाज खान यावेळी उपस्थित होते.
खासदार अशोक नेते यांनी यावेळी पत्रकार हा दुवा असून जनतेचा आरसा दाखविण्याचा कार्यकरत असतो पत्रकार हा निर्भीड पणे कार्य केले पाहिजे असे मनमोकळे पणे बोलतांना खासदार अशोक नेते म्हणाले. पत्रकारांच्या सोबत मी नेहमी उभा आहो.असे ही खासदार अशोक नेते यांनी म्हणाले.