कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपसरपंचां सुरक्षाताई आकदर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजाराम:- अहेरी उपविभागीय पोलीस कार्यालय अंतर्गत येत असलेल्या उप पोलीस स्टेशन राजाराम खां येथे पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधिकारी चित्ता, अप्पर पोलीस अधिकारी तारे, अप्पर पोलीस अधिकारी अहेरी देशमुख यांच्या संकल्पनेतून उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या भव्य पठांगनावर जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंचा सुरक्षा आकदर, उदघाटक एस एम जाधव तालुका कृषी पर्यवेक्षक अधिकारी, प्रमुख पाहुणे ए.आर. चव्हाण तालुका कृषी अधिकारी, पल्लवी चिलबुले पोष्टमास्टर चीरेपली, एन. एम. धकाते आरोग्य औषधी निर्माते, सत्यम भंडारवार पोलीस पाटील, सुरेश दहागावकर पोलीस पाटील, दामाजी गावडे पोलीस पाटील, राहुल कंबगौनीवार महसूल कर्मचारी आदी मंचावर उपस्थित होते.
या मेळाव्यात उपस्थित नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्याविविध शासकीय योजनाची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी अधिकारी पोउनि. साहेबराव कसबेवाड यांनी केले.तसेच शेती विषयक माहिती तालुका कृषी पर्यवेक्षक एस. एम. जाधव यांनी दिली तर या कार्यक्रमात नागरिकांना घरगुती साहित्य वाटप करून आभा कार्ड, पॅन कार्ड, ई श्रम कार्ड, राशन कार्ड चे प्रस्ताव स्वीकारण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोउनि सचिन चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते करिता जिल्हा पोलीस सहकार्य केले.

