दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे ज्ञान प्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर, रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी सुशील शिंगाडे सिंटेल कंपनी सी.एस आर. प्रमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल्ल गायकवाड सर सिंटेल कंपनी सी.एस.आर, डूमे साहेब कौशल्य पब्लिकेशन, काळूराम वाळके जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था, नंदेश्वर सर, श्रीमती ललिता नंदेश्वर, श्रीमती पूनमताई नवीनशेठ भालेकर, प्रा.अशोक धूळधुळे सर सायंटिफिक युनिव्हर्सल अकॅडमी या सर्वांनी १० विच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांनी त्यांच्या आयुष्यातील १० वी तील आठवणीचा उजाळा केला व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमास ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. विठ्ठलराव गवळी साहेब , संस्थेचे सेक्रेटरी नीलकंठ लांडगे , संचालिका श्रीमती सुमनताई गवळी, ज्ञानोबा काळभोर, ज्ञानोबा घोबाळे, निकाळजे हे सर्व उपस्थित होते सर्व प्रथम प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी इयत्ता १० वी व इयत्ता ९ च्या विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. मनोगतातून त्यांनी शाळेविषयी ,शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांनी देखील या प्रसंगी आपापले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व १० वी च्या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यानी केली व कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे यांनी केले मा. श्री. सुशील शिंगाडे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यानी इयत्ता १० वी साठी स्नेहभोजनचा कार्यक्रम आयोजित केला होता यानंतर ९ वी च्या विद्यार्थ्यानी सर्वांचे आभार मानले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348