अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- वाशिम जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील खापरी या गावातील ६५ वय असलेले ज्येष्ठ नागरिक भिका चव्हाण यांचा सतत रुग्णांच्या सेवेत असणारे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जीव वाचवला. भिका चव्हाण या रुग्णाला श्वास घ्यायला खुप त्रास होत होता. दम लागत होता. श्वास वर वर जात होता.संबधित रुग्णांला तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करावे लागेल अशी माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस योगेश लबडे यांनी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांना फोन करून माहीती दिली उमेश इंगळे यांनी क्षणांचा ही विलंब न करता त्या रुग्णाच्या नातेवाईकांना घेऊन सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी दाखल केले व सर्वोउपचार रुग्णालयातिल एम.एस.डॉ गुरूदासानी सर,डॉ मुकुंद अष्टपुत्रे सर यांच्याशी संपर्क साधून सदर रुग्णांला तात्काळ उपचाराची गरज आहे ही माहिती दिली डॉ गुरूदासानी व डॉ अष्टपुत्रे सर यांनी सर्वोउपचार रुग्णालयातिल वार्ड नं ३० च्या कार्यरत डॉक्टर व नर्स ला सांगुन तात्काळ उपचार केले म्हणुन सदर रुग्णाचे प्राण वाचले व आज तो रुग्ण पुर्णपणे बरा होऊन घरी गेले रुग्णांच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे व सरचिटणीस योगेश लबडे यांचे पाणावल्या डोळ्यांनी आभार मानले व जेष्ठ नागरिक असलेल्या रुग्णांनी आर्शिवाद दिले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348