ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पाचोरा:- उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना, युवा सेना तसेच महिला आघाडी तर्फे आज आठवडे बाजार व शनी मंदिर परिसरात मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमतः उद्धव ठाकरे गटाच्या धडाडीच्या नेत्या सौ.वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी शिबिराचे उद्घाटन करून उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना रक्त तपासणीचे महत्त्व विशद करून भविष्यात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या आजारांना प्रतिबंध व उपाय योजना आपणास करता येतात असे नमूद केले व अशा प्रकारच्या शिबिरांचा नागरिकांनी नेहमीच अवश्य लाभ घेतला पाहिजे असे सांगितले. या रक्त तपासणी शिबिरामध्ये वेगवेगळ्या रक्ताच्या तपासण्या केल्या गेल्यात. त्यामध्ये पीएसए, सिबिसी, हेमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसीस, सी 125 एमजी सिरप, कैल्शियम, बिटा एचसीजी या सर्व तपासनीच्या समावेश होता.
याप्रसंगी युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, युवा सेना शहरप्रमुख हरीश देवरे, युवा सेना शहर संघटक प्रशांत सोनार, युवा सेना शेतकरी शहराध्यक्ष श्री. जगदीश महाजन, युवा सेना उपशहर प्रमुख गणेश बडगुजर, नगरसेवक दादाभाऊ चौधरी व श्री दत्ताभाऊ जडे, तसेच गफार शेख, नजिम शेख, प्रवीण वाघ, सौ. मंदाकिनी निलेश पारोचे, सौ.जयश्री सचिन येवले, सौ.कुंदन नरेंद्र पांड्या, सौ.अनिता श्रीराम पाटील, सौ.रंजना प्रताप सैंदाणे, सौ.श्रद्धा सचिन सोनार, श्रीमती. रंजना गोविंद महाले, सौ.मंगल नितीन शिंदे, सौ.ममता दीपक पाटील, सौ.लतिका कुणाल सोनार, सौ.ज्योती ईश्वर पालीवाल, सौ.उषा सुरेश अग्रवाल, सौ.उषाबाई ब्राह्मणे, गफ्फार सय्यद, आकाश महाजन, लोकेश भोई, चेतन भावसार, आकाश पाटील, नीरज पाटील, नीरज ब्राह्मणे, भूषण पाटील, योगेश चौधरी, भिका वाघ तसेच उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या रक्त तपासणी शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348