मंगेश सावरकर, मध्य नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- गुड्डू भगत यांचा “चमचम (रसगुल्ला) बनविण्याचा मोठा कारखाना” भवानी मंदिर पारडी, गुरूदेव पानठेला, गल्ली नं. 1, नागपूर इथे रहिवासी परीसरात अवैधरित्या सुरू असलेला कारखाना बंद करण्याबाबत आरोग्य अधिकारी लकडगंज झोन क्र. 8, महानगर पालिका नागपूर शहर, यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना तर्फे निवेदन देण्यात आले.
नागपुर येथील भवानी मंदिर पारडी, गुरुदेव पानठेला, गल्ली नं 1नागपूर इथे रहिवासी परीसरात गुड्डू भगत यांने अवैधरित्या चमचम (रसगुल्ला) बनविण्याचा मोठा कारखाना
नागरीकांचे जिव धोक्यात घालून स्वतःच्या आर्थिक फायदा करून घेण्याकरीता कुठल्याही विभागाची परवानगी न घेता अवैध रित्या चालवित आहेत. जेव्हा की शासकिय नियमाप्रमाणे उपरोक्त चमचम(रसगुल्ला) बनविण्याचा मोठा कारखाना रहिवासी परिसरात न चालविता इंडस्ट्रीयल एरीया मध्ये शासनाची परवानगी एनओसी घेऊन चालविल्या पाहिजेत. उपरोक्त कारखानामधून नघनारी गंदगी रहिवासी परीसरात परसरून तिथे 24 तास दुर्गगंध येत असतो त्यामुळे तेथील राहणाच्या नागरीकांना निरनिराळे आजार होत आहेत तसेच कारखान्यामधुन निघनारा गंदा चासणीचे पानी नाल्यामध्ये जात असल्यामुळे तेथील परिसरात नागरीकांना मारव दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
उपरोक्त चमचम (रसगुल्ला कारखाना मध्ये मोठ मोठया आगीच्या भट्या आहेत आणि त्या
भट्याचे टेम्परेचर खुप जास्त असते. त्यामुळे तिथे आग लागुन केव्हाही नागरीकांच्या जिवाला हानी पोहपु शकते. जर अशी घटना घडली तर चमचम (रसगुल्ला) कारखाना मध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे आगीवर नियंत्रण करण्याचे कोणतेही उपकरण उपलब्ध नाही आहेत. तसेच तिथेच 8 ते 10 काम करणारे कामगार यांच्या सुद्धा जिवाला अग्नीमुळे जिवीत हानी होऊ शकते. हा कारखाना अवैधरित्या कोणत्याही प्रकारची शासनाची एन ओ सी ने घेता रहिवासी परीसरात गुपचुपपणे चालविल्या जात आहे.
उपरोक्त कारखाण्यात आग लागल्यास अग्नीवर नियंत्रण करण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही, करीता आपणास नम्र विनंती आहे की, उपरोक्त प्रकरण हे गंभीर व ज्वलंत असल्याने वरील गुड्डू भगत यांचा “चमचम (रसगुल्ला) बनविण्याचा मोठा कारखाना” वर लवकरात लवकर कार्यवाही करून उपरोक्त प्राणघातक कारखाना रहिवासी परीसरातुन बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा कार्यवाही न केल्यास शिवसेना व युवा सेना तर्फे तिच आंदोलन करण्यात येईल असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना तर्फे देण्यात आलेल्या निवेदन म्हटले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348