✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा :- जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. हिंगणघाट पासून अगदी जवळ असलेल्या येनोरा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिला शिकवणाऱ्या शिक्षकाने विनयभंग करीत तिची छेड काढण्याचा प्रकार केला. ही घटना समोर येतात संपूर्ण हिंगणघाट तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
28 फेब्रुवारीला सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास येनोरा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा शिक्षकाने विनयभंग केला. हा सर्व प्रकार पिढीत मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना सांगीतला. संतप्त होऊन पालकांनी व गावकऱ्यांनी शालेय परीसरात जमा होऊन सदर आरोपी मुख्याद्यापकास जाब विचारला. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी आरोपी मुख्याद्यापकास चांगलाच चोप दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
येणोरा येथील उच्च शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक ताकसांडे या शिक्षकाच्या विरोधात पीडित विद्यार्थिनीने आपल्या पालकांच्या मदतीने हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली असूनक्ष पोलिसांनी आरोपीला अटक करीत या मुख्याध्यापकाला पास्को सह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करूण प्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राम खोत यांनी कारवाई केली आहे.