Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात नोकरीचे आमिष दाखवून 28 लाख रुपयाची फसवणूक, सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 2, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात नोकरीचे आमिष दाखवून 28 लाख रुपयाची फसवणूक, सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- आज काल नौकरी चे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्यात पुणे येथून अशीच एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) नोकरी लावणे तसेच विद्युत कामाचा ठेका मिळवून देण्याच्या आमिष दाखवत चौघांची 28 लाख रुपयांने फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे शहरातील सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद गोविंद वझे रा. लक्ष्मी पार्क सोसायटी, कोंढवे धावडे, परमेश्वर अंकुश शिंदे रा. ब्रम्हा हॉटेलसमोर, सिंहगड रस्ता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत विजय साखरे वय 42 वर्ष, रा. भूमकर चौक, नऱ्हे यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांन कडून प्राप्त माहितीनुसार, साखरे इलेक्ट्रिक अभियंता आहेत. त्यांचा प्रवासी वाहतुकीसाठी गाड्या पुरविण्याचा व्यवसाय आहे. तर आरोपी शिंदे याचा देखील प्रवासी वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय आहे. त्यातून साखरे यांची आरोपी शिंदे याच्याशी ओळख झाली होती. शिंदेने साखरे यांच्याकडे वझे याची एनडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केली.
वझे एनडीएमध्ये कायमस्वरूपी लिपिक पदावर नोकरी लावून देतील. तसेच त्याच्या ओळखीतून विद्युत विषयक कामाचा ठेका देखील मिळेल, असे आमिष शिंदेने फिर्यादी यांना दाखविले. साखरे यांच्या पत्नीला एनडीएमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देण्यासाठी आरोपींनी आठ लाख रुपयांची मागणी केली. साखरे आणि त्यांच्या तीन नातेवाइकांनी वझे आणि शिंदेला ऑनलाइन तसेच रोखीने एकूण 28 लाख रुपये देवून एनडीएमध्ये नोकरी मिळवून देण्याची विनंती केली. मात्र आरोपींनी नोकरी लावून दिली नाही. तसेच विद्युत विषयक कामाचा ठेकाही मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखरे यांनी तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Previous Post

बायकोसाठी तो पिझ्झा आणायला गेला, घरी येताच, 6 महिन्याच बाळ रडत होत, आणि पत्नी… कुटुंबच झाल उध्वस्त.

Next Post

नागभीड तालुक्यातील कोर्धा येथे काँग्रेस तर्फे ‘हात से हात जोडो’ अभियान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागभीड तालुक्यातील कोर्धा येथे काँग्रेस तर्फे ‘हात से हात जोडो’ अभियान.

नागभीड तालुक्यातील कोर्धा येथे काँग्रेस तर्फे 'हात से हात जोडो' अभियान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In