डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहन चोरी करणारे अट्टल ०२वाहन चोर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाच्या हाती लागले आहेत. या पोलीस पथकाने या चोरट्यांकडून ०३लाख १०हजार रुपये किमतीच्या ०७चोरीच्या दुचाकी जप्त केले आहेत. प्रतिक उर्फ हायजॅक योगीराज खडसे वय २४ वर्ष, रा, लक्ष्मी नगर, येरवडा मूळ रा.मंगळूर पीर, जि. वाशिम, रमन मोहन ठाकुर वय २२ वर्ष, रा.मंचर, ता. खेड, जि. पुणे, शुभम गंगाराम पिटेकर वय २४ वर्ष रा. मंचर ,ता.खेड ,जि.पुणे) असे अटक केलेल्या वाहन चोरट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाईल स्नॅचिंग, चैन स्नॅचिंग, वाहन चोरी, घरफोडी गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस आणणेकरिता वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार दरोडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबीरीष देशमुख, पोलीस उप -निरीक्षक मंगेश भांगे, उपनिरीक्षक भरत गोसावी व पथकातील अंमलदार असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेले न उघडकीस आलेले गुन्ह्याबाबत माहिती घेत असताना पोलीस नाईक गणेश कोकणे व पोलीस नाईक कदम यांना माहिती मिळाली की, पिंपरीतील संत तुकाराम परिसरात एक इसम दुचाकी चोरी करण्यासाठी येणार आहे .त्याच्या जवळ असलेली दुचाकी देखील चोरी केलेली आहे.
मिळालेली खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक यांनी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना देत त्यांच्या सूचनाप्रमाणे पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी सापळा रचून मोठे शिताफीने या चोरट्यांना ताब्यात घेतले .चौकशी अंतर्गत तो एक अट्टल चोरट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पिंपरी, आळंदी ,लोणावळा, चाकण पोलीस ठाणे हद्दीत त्याने दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ०५चोरीच्या दुचाकी जप्त केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व स्टाफ हे चिंचवड गावात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक आशिष बनकर,व पोलीस नाईक प्रवीण कांबळे यांना मिळालेले माहितीवरून आरोपी रमण ठाकूर शुभम पिटेकर यांना पथकांनी अटक केली. त्यांच्याकडून ०२ चोरीच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत. तसेच हिंजवडी आणि मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दुचाकी चोरीचे ०२गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे स्वप्ना गोरे,सहाय्य पोलिस आयुक्त पद्माकर घनवट, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक आंबरिष देशमुख, उपनिरीक्षक मंगेश भांगे, उपनिरीक्षक भरत गोसावी, सहायक पोलीस फौजदार महेश खांडे, हवलदार नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड ,उमेश पुलगम, राहुल खारगे, आशिष बनकर, प्रवीण कांबळे, सागर शेडगे, गणेश कोकणे, अमर कदम, समीर रासकर, प्रवीण माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

