अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर :- येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्य बस स्थानकासमोर लोकशक्ती ग्रुप, शिवकृपा ग्रुप,आर्यन ग्रुप व समस्थ रामभक्त सावनेरच्या वतीने श्री.सिद्धेश्वरी जागरण अँड म्युझिकल ग्रुप (परासिया म. प्र. ) एक शाम प्रभू श्रीराम के नाम या बॅनर खाली श्रीरामाच्या जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमानिमित्त आयोजकाच्या वतीने श्रीरामाची भव्य मूर्तीची स्थापना करण्यात येत असून सायंकाळी 4 वाजता पासून महाप्रसादाची सुरुवात होणार आहे.प्रभू श्रीरामाच्या रथाचे आगमन होताच ढोलताशे व फटाक्याची आतिषबाजी करीत स्वागत करण्यात येईल. 30 मार्चला होणाऱ्या या भक्तीमय कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.