सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- सामाजिक न्याय पर्व व शासकीय योजनांच्या जत्रेच्या अनुषंगाने जिल्ह्यात 17 एप्रिल रोजी जिल्हयातील आश्रमशाळेत ऊसतोड कामगारांसाठी नाव नोंदणी, ओळखपत्र वाटप करणे, ऊसतोड कामगारांसाठी पुनरागमन शिबीराचे (धान्य महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर आश्रमशाळा गजाधरजी राठोड प्राथमिक आश्रमशाळा, खापरदरी, ता. मानोरा, वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा, फुलउमरी, ता. मानोरा, तपस्वी काशिनाथ बाबा माध्यमिक आश्रमशाळा, वाईगौळ, ता. मानोरा, सुधाकरराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा, इंगळवाडी, ता. मानोरा, प्रियंका विजाभज प्राथमिक आश्रमशाळा, सोंडा, ता. जि. वाशिम येथे आयोजित करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348