विक्की डोके भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- तुमसर तालुक्यांतील देव्हाडी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार सहा महिन्यापासून पती व सासूकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून रागाच्या भरात विवाहितेने त्रासाला कंटाळून राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. ही घटना 14 एप्रिलला रात्रीच्या सुमारास घडली. हिमाक्षी सतीश बेलेकर वय 26 वर्ष, कुंभार टोली, देव्हाडी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
हिमाक्षी सतीश बेलेकर हिच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पती सतीश देविदास बेलेकर वय 30 वर्ष व सासू रत्नमाला देविदास बेलेकर वय 60 वर्ष यांना अटक केली आहे. हिमाक्षीचे वडील हेमराज सुक्कल गजभिये वय 53 वर्ष अंबाझरी टेकडी, नागपूर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

