पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पुणे :- दि. ११/०४/२०२३ रोजी वेलनेस मेडीकल, समोरिल ढोले पाटील या सार्वजनिक रोडवर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीत पुढील सिटवर ठेवलेली काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग व त्यातील इतर साहित्य असे १,१२,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचे संमतीवाचून चोरून नेले म्हणून कोरेगाव पार्क पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास तत्परतेने परिष्ठांचे मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करुन तसेच तांत्रिक विश्लेषनाव्दारे सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे व पोलीस उप निरीक्षक श्रीकांत सावंत यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडुन दोन अनोळखी इसम संशयीतरित्या मॉर्डन कॅफे शिवाजीनगर परिसर पुणे येथे थांबले बाबत माहिती प्राप्त होताच तपास पथकातील अधिकारी व स्टाफ यांचेसह शिवाजीनगर परिसर पुणे येथील मॉर्डन कॅफे शिवाजीनगर पुणे येथे जावुन दोन अनोळखी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातील बॅगेची पाहणी केली असता कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गुरन ५९/२०२३ भादविक ३७९.३४ या गुन्हयातील मुद्देमाल मिळुन आला त्यांना अधिक विश्वासात घेवुन त्यांचे नाव व पत्त्याबाबत विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) राजशेखर धनशिलन वय ३७ वर्षे रा. मील कॉलनी रामजीनगर तिरुचिरापल्ली तमिळनाडू राज्य पो.स्टे.इपुदूर २) गिरीधरन उमानाथ वय २० वर्षे,
रा. गांधीनगर पोष्ट रामजीनगर तिरुचिरापल्ली तमिळनाडू राज्य पो. स्टे इपुदूर असे असल्याचे सांगितले, वर नमुद आरोपीकडे तपास केला असता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केले असलेबाबत निष्पन्न झाले आहे.
(५) कोरेगाव पार्क पो.स्टे.गु.र.नं.६८/२०२२ भादंवि कलम ३११९,४२७.२) कोरेगाव पार्क पो.स्टे. गु.र.नं. १३/२०२२ भादंवि कलम ३७९.पा.पि. २०/०७/२०२२.३) अलंकार पो.स्टे.गु.र.नं. ५२/ २०२३ भादंवि कलम ३७९.४२७. ४) शिवाजीनगर पो.स्टे. गु.र.नं.७३/२०२३ मादंवि कलम ३७९, ५) डेक्कन पो.स्टे.गु.र.नं. ४८/२०२३ भादंवि कलम ३७९, ४२७ ६) डेक्कन पो.स्टे.गु.र.नं. ४९/ २०२३ भादंवि कलम ३७९,४२७. ७) डेक्कन पो.स्टे. गु.र.नं. ५८/२०२३ भादंवि कलम ३३०९,४२७.अशा प्रकारे गाडीच्या काचा फोडुन गाडी पंक्चर झाल्याचे बहाणा करुन, पैसे खाली पडल्याचे सांगुन चोरी करणा-या सराईत परप्रांतीय टोळीस अटक करुन “कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने ” पुणे शहरातील एकुण ०८ गुन्हे उघडकीस आणुन किंमती मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम), पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे मा. पोलीस उप-आयुक्त परि २ पुणे शहर श्री. श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा पोलीस आयुक्त, लष्कर विभाग पुणे शहर श्री आर. एन. राजे. परिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे पुणे शहर, श्री. विनायक वेताळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती दिपाली भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे, पोउनिरीक्षक सावंत व पोलीस अंमलदार नामदेव खिलारे, विजय सावंत, विशाल गाडे, रामा ठोंबरे, विलास लोगे, रमजान शेख , गणेश गायकवाड , विवेक जाधव, सचिन भोसले, बालाजी घोडके, प्रविण पडवळ यांनी पार पाडली.

