पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- चतुर्शृंगी पो. स्टे. गुन्हा रजि नं २७७/२०२३, भा. दं. वि. कलम ४५४,४५४,३८० हा गुन्हा दिनांक ०२/०२/२०२३ ते १०/०४/२०२३ रोजी घडला असुन दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार हे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्टाफमधील पोना ७५५९ रविंद्र लोखंडे यांना त्यांच्या cctv फुटेजच्या मदतीने तसेच त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फतिने मिळालेल्या बातमीतील वर नमुद गुन्हा हा गुन्हे अभिलेखावरील घरफोडी चोरी करणारा आरोपी नामे रोहित लंके, रा. विश्रांतवाडी पुणे व त्याचा साथीदार याचेसह मिळून केला असून ते दोघेही वीर बाजीप्रभू विद्यालय गोखलेनगर पुणे येथील मोकळ्या मैदानात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही सदर बाबत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी मा. पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांना कळविले असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने वरील स्टाफच्या मदतीने सदर संशयित दोन आरोपीतांस शिताफिने ताब्यात घेऊन पुढील चौकशी करता कार्यालयात आणून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे, पत्ते अ.क्र. 1) रोहित उर्फ रावण नानाभाऊ लंके, वय – २५ वर्ष, रा. अनिरुद्ध अपार्टमेंट, कस्तुरबा झोपडपट्टी, विश्रांतवाडी पुणे, 2) मंगेश उर्फ सोन्या विजय चव्हाण, वय – २५ वर्ष, रा. अल्पना टॉकीज जवळ, मच्छी मार्केट मागे, गणेश पेठ, पुणे असे सांगितले. वर नमुद आरोपींकडे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी करता त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करून अटक मुदतीत अ.क्र. 1) रोहित उर्फ रावण नानाभाऊ लंके, वय – २५ वर्ष, रा. अनिरुद्ध अपार्टमेंट, कस्तुरबा झोपडपट्टी, विश्रांतवाडी पुणे याने कथन केलेल्या निवेदनाप्रमाणे वर नमुद गुन्ह्यातील किं. रू. १,४५,६००/- चे सोन्याचे दागिने व कडी कोयंडा तोडण्याकरिता वापरलेला पोपट पाना असा मुद्देमाल भापुका कलम २७ प्रमाणे मेमोरंडम पंचनाम्याने दोन पंचांसमक्ष जप्त करुन ताब्यात घेण्यात आला आहे. वर नमुद आरोपीतांकडून वरील पो स्टे कडील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
दोन्ही आरोपी घरफोडीचे
रेकॉर्डवरील असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही कामी चतुर्शृंगी पोलिस स्टेशन* यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.सुनील पवार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री ब्रह्मानंद नाईकवाडी यांचे मार्गदर्शनाखाली, स पो नि पाटील, G.PSI शाहिद शेख, पोलीस अंमलदार रविंद्र लोखंडे, बाळु गायकवाड, मॅगी जाधव, गणेश ढगे, सुमित ताकपेरे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, श्रीकांत दगडे, महेश पाटील या पथकाने केलेली आहे ..