परसबाग उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गापुर प्रथम क्रमांक
नितेश पत्रकार, उपजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
7620029220
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत परसबाग उपक्रम राबविण्यात आला त्या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गापुर पंचायत समिती झरी जामणी शाळेला प्रथम क्रमांक पटकावलेला आहे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता ज्या शाळेत सुंदर असे परसबाग असेल त्या परसबागेत विविध प्रकारचे भाजीपाला तसेच फळांचे झाड व फुलांचे झाड असेल अशा शाळेची निवड या परसबाग उपक्रमात करण्यात येणार होती या सर्व निकष मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गापुर परिपूर्ण ठरली दुर्गापुर शाळेत सर्व प्रकारचे भाजीपाला त्यात टमाटे, वांगी, मिरची, सांभार, पालक, मेथी, कांदे, लसन, बटाटे या सर्व प्रकारचे भाजीपाला लावण्यात येते तसेच सर्व प्रकारचे फळझाड शाळेत आहे. विविध प्रकारचे फुलं झाड ही शाळेत उपलब्ध आहे. या सर्व निकष जिल्हा परिषद दुर्गापूर पूर्ण केले यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री डी. एस .यादव, सहाय्यक शिक्षक श्री. पी.एम .चौधरी, स्वयंपाकी ताई रोकमा शेंडे शाळेतील सर्व विद्यार्थी हे यासाठी खूप मेहनत करते. शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पूर्ण गावकरी यांचे खूप सहकार्य आहे.
प्रत्येक उपक्रमात जिल्हा परिषद शाळा दुर्गापुर सहभाग घेते आणि पहिल्या तीन क्रमांकात शाळेचा नाव जिल्ह्यात राहते.आतापर्यंत अनेक उपक्रमात जिल्हा परिषद शाळा दुर्गापुर यांनी पंचायत समिती झरीचे नाव लौकिक केलेले आहे.