असा आरोप धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती चे पदाधिकारी सचिव रुपेश (छोटू भाऊ) उगले यांनी केला आहे.
संदीप सुरडकर नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात अनेक महापुरुषाचे स्मारकासाठी शासनाने घोषणा तर केल्या पण शासनाच्या या घोषणा मात्र पोकळ निघाल्या. अशीच एक घटना नागपुर येथून समोर आली आहे. त्यामुळे परत एकदा शासनाच्या पोकळ आश्वासने किती फोल असतात याची अनुभूती छत्रपती संभाजी महाराज प्रेमिला झाला आहे.
नागपूर शहरातील मानेवडा चौक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे म्हणून नागपुर महानगर पालिकेने निधी मंजूर केला होता तो निधी चोरीला गेला? असा आरोप धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीच्या पदाधिकारी सचिव रुपेश (छोटू भाऊ) उगले यांनी केले आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीच्या पदाधिकारी सचिव रुपेश (छोटू भाऊ) उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार 1)नागपूर महानगरपालिका अंदाज पत्रक 2013-14 पुष्ठ क्र. 149 निधी -60 लाख 2016-17 पुष्ठ क्र. 151 निधी 1 कोटी 20 लाख 2018-19 पुष्ठ क्र. 133 निधी – 3 कोटी 2019-20 पुष्ठ क्र. 133 -2 कोटी 50 लाख नागपूर 2020-21चे अंदाज पत्रक. 2) संभाजी महाराजाच्या 15 फूट पूर्णकृती पुतळा मंजूर असताना देखील का उभारण्यात आला नाही? 3)महाराजाच्या स्मारकच्या जागेवर पक्के बांधकाम कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आले? असा आरोप समितीच्या पदाधिकारी सचिव रुपेश (छोटू भाऊ ) उगले यांनी केले आहे.