Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात पाणीटंचाई, पाणी टँकरचा काळाबाजार जोमात, महानगर पालिका प्रशासन कोमात?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 8, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात पाणीटंचाई, पाणी टँकरचा काळाबाजार जोमात, महानगर पालिका प्रशासन कोमात?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात उन्हाळ्या तापायला लागला आहे त्यामुळे पाणी टंचाई सुरू झाली आहे. पाण्याची टंचाई बघता पाण्याच्या टँकरला शहरात मागणी वाढली असल्याने टँकरच्या दरात मोठी वाढ करून नागरिकांची लूट सुरू आहे. पाणी टँकरचा काळाबाजार जोमात, मनपा प्रशासन कोमात? असे चित्र दिसून येते आहे. पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात पाण्याच्या टँकरसाठी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. काही ठिकाणी 1हजार 300, काही भागात 1 हजार 500 रूपये तर काही ठिकाणी 2 ते 2 हजार 500 हजार रुपयांना नागरिकांना टँकर विकत घ्यावा लागत आहे. वापरण्याच्या पाण्याचा टँकरही 700 ते 800 रुपयांना मिळत आहे. पाणीटंचाई भेडसावत असलेल्या भागात टँकरचा काळाबाजारही सुरू झाला असून, महापालिकेकडून पाणी घेऊन ते तिप्पट ते चौपट दराने विकण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत. मात्र या प्रकाराकडे पालिका दुर्लक्ष करत आहे.

महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावर पालिकेचे तसेच महापालिकेने ठेकेदारी पद्धतीने दिलेले व खासगी अशा तिन्ही प्रकारचे टँकर भरले जातात. पालिकेच्या टँकरसह खासगी टँकरलाही मागणी वाढली आहे. महापालिकेकडून कमी दराने टँकर भरून अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये चढ्या दराने पाणी दिले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला अडचणी येतात, अशा ठिकाणी पालिकेच्यावतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो.

सोसायटीनुसार ठरतात टँकरचे दर
एखाद्या सोसायटीला ज्या टँकरचालकाने पाणी दिले असेल त्यानेच त्या सोसायटीला पाणीपुरवठा करायचा इतर ठेकेदाराला या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यास मज्जाव केला जातो. यामुळे पाण्याची गरज भागविण्यासाठी नागरिकांना टँकर ठेकेदाराला मागेल त्या दराने टँकर घ्यावा लागतो. खासगी टँकर चालकांकडून महापालिका 634 ते 1 हजार 408 रूपये या दरम्यान शुल्क आकारते. खासगी टँकरचालक नागरिकांकडून एका टँकरसाठी अंतरानुसार 1 हजार 300 ते 2 हजार 500 रूपये घेत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा सोसायटी पाहून टँकरचे दर आकारले जात असल्याचे समोर आले आहे.

येथे वाढल्या टँकरच्या फेऱ्या
सध्या टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. शहराचा पूर्व भाग असलेल्या वडगावशेरी, लोहगाव, खराडी, विमाननगर, कात्रज व परिसर, वारजे, पौड रस्ता, पाषाण, कोंढवा आदी उपनगरांमध्ये टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. काही खासगी टँकरचालक महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रांवरून पाणी घेतात तर काही टँकर समाविष्ट गावांमध्ये असलेल्या खासगी विहिरी, बोअरवेलमधूनही टँकर भरून घेतात. पालिकेच्या भरणा केंद्रावर मोठी रांग असल्याने सध्या अशा सर्व विहिरींवरून टँकर भरणा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

पालिकेचा दहा हजार लिटरचा टँकर 882 रुपयांना
ज्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला अडचणी येतात, अशा ठिकाणी पालिकेच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो. पण पालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा दहा हजार लिटरपर्यंतचा टँकर मागविण्यात आला तर त्यासाठी 882 रूपये दर आकारला जातो.

महापालिकेच्या पाससाठी टँकरचे पाण्याचे दर
महापालिकेच्या टँकर पाॅइंटवरून खाजगी टँकरचालक पाणी भरतात. त्यांना महापालिका पास देते. या खाजगी टँकरकडून 10 हजार लिटर्ससाठी 634 रूपये, 10 हजार लिटर्स ते 15 हजार लिटर्सला 999 रूपये आणि 15 हजार लिटर्सपेक्षा जास्त क्षमतेसाठी 1 हजार 408 रूपये दर आकारला जात आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

खबरदार महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मुली होत आहे बेपत्ता, मार्च 2200 मुली बेपत्ता; तीन महिन्यात 5 हजार 610 मुली झाल्या गायब.

Next Post

हिंगणघाट: एकाही व्यक्तीला राष्ट्रीय महामार्गावर अपघातात आपला जीव गमवावा लागला तर होणार आंदोलन: अतुल वांदीले

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: एकाही व्यक्तीला राष्ट्रीय महामार्गावर अपघातात आपला जीव गमवावा लागला तर होणार आंदोलन: अतुल वांदीले

हिंगणघाट: एकाही व्यक्तीला राष्ट्रीय महामार्गावर अपघातात आपला जीव गमवावा लागला तर होणार आंदोलन: अतुल वांदीले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In