सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
मोबा. न. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावेळी बल्लारपूर येथील दिलासाग्राम कन्वेट स्कूलच्या विद्यार्थिनी चांगले गुण मिळवत घवघवीत यश मिळवलं आहे. दिलासाग्राम कन्वेट स्कूलचे 100 टक्के विद्यार्थी पास झाले आहे. या यशाबद्दल दिलासाग्राम कन्वेट स्कूलच्या विद्यार्थाचे सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि ध्येयाने झपाटून केलेल्या अभ्यासामुळेच त्यांना हे यश मिळाल्या विथार्थानी सांगताना आई वडीलाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार रोजी लागला. भविष्याचा मार्ग या निकालावर अवलंबून असल्याने विद्यार्थी आणि पालक या निकालाकडे नजरा लागल्या होत्या. बल्लारपुर येथील दिलासाग्राम कान्वेंट स्कूल सीबीएसई बोर्ड मध्ये शंभर टक्के निकाल लागला आहे. ज्यामध्ये प्रथम आदर्श सतीश मिश्रा 97%, द्वितीय अदन्या अजय ताजने 96% व तृतीय साक्षी दिलीप कोंडपतिवार 95% या विद्यार्थ्यांनी स्थान प्राप्त करून विद्यार्थांनी शाळेच्या बरोबर आपल्या पालकांचे नाव उज्वल केले आहे. यात 12 विध्यार्थी मेरिट मध्ये पास झाले, 28 विध्यार्थी डी टी मध्ये पास झाले आले, 33 विध्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये पास झाले व 17 विध्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये पास झाले. बल्लारपुर शहरात 100 टक्के निकाल देण्याचा कीर्तिमान स्थापित केला आहे. या विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, शिक्षक आणि मित्रांना देत त्यांचे आभार मानले आहेत.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

