✒️प्रशांत जगताप, मुख्यसंपादक 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- आंबेडकरी चळळीतील प्रमुख नेते, महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. शिल्पकार मनोज भाई संसारे यांनी वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या असे अचानक निधनाने आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन चळवळ पोरकी झाली आहे. मनोज भाई संसारे हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्याच काल निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच तम्माम महाराष्ट्रातील रिपब्लिकन आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यानी शोककळा पसरली.
मनोज भाई संसारे यांनी आजन्म आंबेडकरी चळवळीतील कार्य केल. हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है ही घोषणा देत त्यांनी संपूर्ण राज्यात आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी जीवच रान केलं. ते मागील अनेक दिवसा पासून जीवनाशी संघर्ष करत होते. अखेर त्यांची झुंज संपली.
मनोज भाई संसारे हे उत्तम नेते, संयमी संघटक, बहारदार गायक, जलंत स्वाभिमानी चळवळकर्ते होते. अण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावर संविधान विरोधी अजेंडा विरोधात मनोज भाई संसारे यांनी मुंबईत देशातील पहिलं आंदोलन केल. जेव्हा संपूर्ण देश वरपासून खालपर्यंत अन अनेक समविचारी पुरोगामी मंडळी या नादाला लागलेली असताना केवळ आंबेडकरी चळवळ एकमेव होती जीने विरोध केला, देशातील धोके ओळखले, त्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज भाई संसारे यांनी केल. त्यानंतर आंबेडकरी चळवळ समाजात असणारी मरगळ दूर करण्यासाठी काहीतरी घडायला हवं होतं. ते रिपब्लिकन पुनर्बांधणी अभियान चालवून संपूर्ण महाराष्ट्रात ते फिरले आणि आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी नेहमी कळकळीने कार्य केल.
रिपब्लिकन चळवळ पुनर्बांधणी अभियान म्हणून राज्यभर दौरे करत शेवटी कुर्ला येथे स्वाभिमानी रिपब्लिकन या पक्षाची स्थापना केली. या काळात समाजात दबावगट नव्हता. ताकद वाटावी असा राज्यपातळीवरील पक्ष नव्हता, त्यामुळे हा नवा प्रयोग राज्यातील अनेक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भावला. त्यामुळे अनेक कार्यकर्ते मनोज भाई संसारे यांच्या बरोबर काम करत होते.

