खंडणी विरोधी पथक 2 ने संदिप मोरे ला ठोकल्या बेड्या.
✒️पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे संपूर्ण पुणे जिल्हात खळबळ माजली होती. या हत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत चार जणांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी एकाला पुणे पोलिसांनी तर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. श्याम नीगडकर, संदीप मोरे, राघू धोत्रे आणि आदेश धोत्रे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे यांची काल शुक्रवारी रोजी दिवसाढवळ्या भऱ दुपारी दोन वाजताच्या सुमारास नगर परिषदेच्या हद्दीत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांनतर त्यांच्यावर कोयत्याने वार केले. धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यू झाल्यानंतरही आरोपी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या आरोपींच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची विविध ठिकाणी पथके रवाना केली होती. मात्र, आज दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक 2 पुणे शहर पथकांने तिघांना ताब्यात घेतलं. काल शुक्रवारी रात्री आणि आज शनिवारी पहाटेपर्यंत पोलिसांची शोधमोहीम सुरू होती.

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु र न 233/2023 भा.द .वी कलम 302,120 (ब), आर्म्स ऍक्ट 3 (25), 4 (25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 या गुन्हातील आरोपी नामे संदीप विठ्ठल मोरे रा- आकुर्डी पुणे याचा शोध घेत असताना पो ना 1933 सचिन अहिवळे याना त्यांच्या बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, संदीप विठ्ठल मोरे हा सध्या गल्ली नंबर पाच कर्वेनगर पुणे येथील जिजाऊ आपारमेंट बिल्डिंगच्या शेजारील बिल्डिंग मधील फ्लॅट नंबर 3 मध्ये झोपलेला असून त्याने अंगावर रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे. अशी बातमी मिळण्याने तेथे स्वतः पो ना 1933 अहिवळे, पोहवा 2471 जगदाळे, पोहवा 3125 शितोळे, पोहवा 1855 उत्तरकर असे खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जाऊन फ्लॅट नंबर 3 मध्ये संदीप विठ्ठल मोरे हा मिळून आल्याने त्यास पकडून त्याचे नाव व विचारतात आणि त्याचे नाव संदीप विठ्ठल मोरे वय 40 वर्षे रा- पंचतारा नगर संभाजी चौक गणेश मंदिराजवळ आकुर्डी पुणे असे सांगिल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
नाना उर्फ संदिप विठ्ठल मोरे रा. पंचतारानगर, संभाजी चोक, गणेश मंदिरजवळ, आकुर्डी असे पुणे शहर पोलिसांनी पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन केलेल्याचे नाव आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी माहिती दिली. शुक्रवारी भरदुपारी किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या समोर गोळया घालून आणि कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला होता. मारेकरी कोयत्याने वार करीत असलेले व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. किशोर आवारे यांच्या खून प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे..
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या.

