पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुण्यातील खराडीमधील इन ऑन आयटी पार्क येथे सॉफ्टवेअरचा व्यवसाय करणाऱ्याकडे 5 लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्यांना पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवारी ( दि.18) दुपारी चारच्या सुमारास पाटस टोल नाक्याजवळ घडला. यावेळी पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या दोन तथाकथित पत्रकारांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. करण्यात आलेल्या महेश हनमे याच्यावर सोलापूर येथे बलात्काराचा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
महेश सौदागर हनमे (रा. सोलापूर) आणि त्याचा साथीदार दिनेश हनमे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी पुण्यातील खराडी परिसरातील एका व्यवसायिकाकडे 5 लाखाची खंडणी मागितली होती. आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस गेले असता खंडणी बहाद्दरांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत गुन्हे शाखेतील पोलिसांनी खंडणी बहाद्दरांवर गोळीबार केला असता गोळी खंडणीबहाद्दरांच्या गाडीच्या पाठीमागील चाकांवर लागली. आरोपी हे तथाकथत पत्रकार असल्याची माहिती समोर येत असून हनमे याच्यावर सोलापूर येथे बलात्का गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे ऑगस्ट 2022 पासून खराडी येथील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिक यांच्याकडे खंडणी मागत होते. त्यांनी तब्बल 5 कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. आतापर्यंत व्यावसायिकाने त्यांना 3 लाख 80 हजार रुपये दिलेले आहेत. दरम्यान, हनमे याच्याकडून वेळावेळी पैशाची मागणी होत होती. महेश सौदागर हनमे हा स्वतः पत्रकार असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या खोटया बातम्या तयार करून त्या बातम्या व्हॉट्सअॅपवर विविध लोकांना पाठवून पोलिस केस करण्याची धमकी दिली होती.दरम्यान, आज महेश हनमेने व्यावसायिकास कुठल्याही परिस्थिती 50 लाख रूपये हवे आहेत अशी धमकी दिली होती. त्यासाठी त्याने त्यांना जिल्हयातील मोहोळ येथील हॉटेल स्वराज याबाबतची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली होती.
येथे बोलावले होते.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त रितेश कुमार , सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक ,अप्पर आयुक्त रामनाथ पाकळे , पोलिस उपायुक्त अमोल झेंडे , सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस हवालदार प्रदिप शितोळे, विनोद साळुंके पोलिस नाईक सुरेन्द्र जगदाळे , सचिन अहिवळे,सदोबा भोजराव, अमोल पिलाने हे आरोपींच्या मागावर आज (गुरूवार) मोहोळकडे झाले.आपल्या मागावर असल्याची चाहूल आरोपींना लागली. पाटस टोल नाक्याजवळ पोलिस गेले असता तेथे आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आरोपींवर गोळीबार केला.गोळ्या गाडीच्या पाठीमागील टायरवर लागल्या आहेत. पोलिसांनी पाठलाग करून महेश सौदागर हनमे आणि दिनेश हनमे यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

