पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुण्यातील एका महीलेस दिनांक १९/०२/२०२३ ते आजपावेतो पर्यंत १) @Riyagym9 २) @Sagar Wa95914876 ३) @sunnynagwekar ४ ) @Tadiparas 4) @Ravan_96 हया व्टिटर अंकाउंट वरून वेळोवेळी सोशल मेडीयावरुन पाठलाग करून मनास लज्जा वाटेल असा आक्षेपार्ह व अश्लिल मजकुर व्टिट करुन प्रसारीत केला व फिर्यादी यांची बदनामी करून त्यांना शिवीगाळ केली म्हणुन फिर्यादी यांनी वरील व्टिटर हॅन्डल व वापरकर्ते यांच्या विरोधात सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.वर नमूद अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्हयाचे तपासामध्ये गुन्ह्यात वापरलेले व्टिटर हॅन्डलचा टवीटर कंपनीशी पत्र व्यवहार केला तसेच इतर तांत्रिक बाबींचा तपास करुन त्याचे तांत्रिक विष्लेशन करून आरोपीताचा शोध घेतला असता गुन्ह्यातील आरोपीतांनी वापरलेले @Tadiparas या टवीटर हॅन्डल करणाऱ्या आरोपी नामे कुणाल भागवत रायसिंग, वय-३९ वर्षे, सध्या रा. २ रा गोखले रोड, दादर वेस्ट, मुंबई यास दि. १९/०५/२०२३ रोजी १२.५१ वा. अटक केली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, श्री. विजयकुमार पळसुले, व.पो.नि. मिनल सुपे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पो. नि. चंद्रशेखर सावंत, पोलीस उप-निरीक्षक सचिन जाधव, पो अमलदार प्रविणसिंग राजपूत, वैभव माने, बाबासो कराळे, शिरीष गावडे, पूजा मांदळे व सोनावणे या पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली.

