Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चिखली पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी सराईत चोरास ठोकल्या बेडया दोन मोटर सायकल चोरीचे व दोन लॅपटॉप चोरीचे असे एकुन ४ गुन्हे उघड

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 21, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चिखली पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी सराईत चोरास ठोकल्या बेडया दोन मोटर सायकल चोरीचे व दोन लॅपटॉप चोरीचे असे एकुन ४ गुन्हे उघड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

चिखली पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मागील तीन ते चार महिन्यांपासून चिखली पोलीस ठाणे व पिंपरी-चिंचवड परिसरामधुन मोठया प्रमाणात वाहन चोरीला जात आहेत. त्यामुळे अश्या मोटार सायकल चोरीला प्रतिबंध व्हावा यासाठी उपाय म्हणुन मा. वरिष्ठांच्या निर्देशनानुसार चिखली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.ज्ञानेश्वर काटकर, यांनी वाहन चोरी विरोधी पथक तयार करून त्याअनुषंगाने पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये नियमीत पेट्रोलींग करण्यास व बातमीदार नेमून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली.त्यानुसार आज दि. २०/०५/२०२३ रोजी वाहन चोरी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. राकेश गुमाने, सहा. पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अमलदार पोहवा. १९३३ / साकोरे, पोना. १५४६ / गायकवाड, पोना. १८५६/पिंजारी, असे मोटर सायकल चोरीस प्रतिबंध होण्याच्या अनुषंगाने चिखली पोलीस ठाणेच्या हददीमध्ये पेट्रोलींग फिरत असतांना असतांना त्यांना नेवाळेवस्ती व हरगुडेवस्ती दरम्यान एक संशयीत इसम मोटार सायकलवरुन येत असल्याचे दिसून आले. त्यास त्यांनी थांबवुन त्याचेकडील मोटार सायकल बाबत खात्री करता त्याचेकडे मोटार चालविण्याचा परवाना द मोटार सायकल मालकी संदर्भात कोणतेही कागदपत्र उपलब्ध नव्हती, तसेच त्याचेकडे वाहनाबाबत खात्री करता उडवाउडवीची उत्तरे दिली.

सदरचा इसमाची हालचाल संशयास्पद दिसून आल्याने त्यांनी त्याचेकडे असलेली रॉक पाहता त्यामध्ये दोन लॅपटॉप दिसुन आलेले आहेत. लॅपटॉप बाबत देखील त्याचे कडे माहीती विचारता तो कोणतेही समाधानकारक उत्तरे दिली नाही, त्यामुळे सदर इसमाला नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव टिकम बिवाराम चंद, वय २५ वर्ष रा. सोळंकी डिस्ट्रीब्युटस्.सी/३९/४०, कुणाल प्लाझा, चिंचवड रेल्वे स्टेशन रोड, चिंचवड, पुणे मुळ रा. मु.पो. शेहवाज ता.मारवाड जंक्शन जि.पाली राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितलेले आहे. त्यास त्याचे ताब्यातील मोटर सायकल व लॅपटॉपसह चिखली पोलीस ठाणे येथे त्याचेकडे हिरो स्पेल्डर मोटार सायकल नंबर एम.एच.१४ ईई १४१६ व लॅपटॉपबाबत श्री. राकेश गुमाने यांनी विश्वासामध्ये घेवून चौकशी केली असता त्याने काल दिनांक १९.०५.२०२३ रोजी सकाळी ०७.०० वाजण्याचे सुमारास नेवाळेवस्ती येथून मोटार सायकल चोरलेली असल्याचे सांगितलेले आहे. तसेच लॅपटॉपबाबत चौकशी करता त्याने पुर्णानगर व जाधववाडी येथे कारची काच फोडुन त्यामधील लॅपटॉप व मोटार सायकलचे हॅन्डलला लावलेला लॅपटॉप चोरी केलेला सांगितलेले सदर चोरीबाबत चिखली पोलीस ठाणेकडील अभिलेखाची पाहणी करता मोटार सायकल चोरीबाबत चिखली पोलीस ठाणे गु.र.नं. ३३६ / २०२३ भादविक ३७९ व लॅपटॉप चोरीबाबत चिखली पोलीस ठाणे गु.र.नं.३३८/२०२३ भादविक ३७९, ४२७ व गु.र.नं.३३९ / २०२३ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आलेले आहे. आरोपी याचे ताब्यातुन १२०,००० रुपये किंमतीची एक हिरो स्पेल्डर मोटार सायकल नंबर एम.एच.१४ ईई १४१६, २) ३०,००० रुपये किंमतीचा एक एच. पी. प्रो बुक-४४० जी-४ कंपनीचा सिल्वर रंगाचा लॅपटॉप, ३) ४०,००० रुपये किंमतीचा एक डेल कंपनीचा काळया रंगाचा लॅपटॉप, ४) ५०० रुपये किंमतीची एक काळया रंगाची लॅपटॉप बॅग असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यानंतर सदर आरोपीस चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ३३६ / २०२३ भादवि कलम ३७९ मध्ये अटक करुन त्याचेकडे पोलीस कस्टडीत असतांना तपास केला असता गेले ४ दिवसापुर्वी रामनगर, चिंचवड, पुणे येथुन एक हिरो स्पेल्डर मो.सा. नंबर एम.एच.२२.के. ४२७४ ही चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने ती मोटर सायकल जप्त केली आहे. सदर बाबत पिंपरी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे.

सदरची कारवाई आम्ही तसेच देहुरोड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्री. पदमाकर घनवट, चिखली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राजेंद्र बर्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. राकेश गुमाने, पोहवा / ११२३ साकोरे, पोहवा / ५७२ पांढरे, पोडवा/९६४ नागरे, पोना / ९६२ राठोड, पोना. १५४६/गायकवाड, पोना / १८१३ सुतार, पोना. १८५६ / पिंजारी, या पथकाने केली आहे. असून त्यांनी एकुन ४ गुन्हे उघडकीस आणले आहे.

Previous Post

सोशल मेडीयावरुन फिर्यादी महीला यांना अश्लील कमेंट करणा-या आरोपीस अटक

Next Post

वाशिम जिल्हातील मालेगाव येथे कुजलेल्या अवस्थेत पोत्यात बांधलेल्या मिळून आला अनोळखी महिलेचा मृत्यूदेह.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वाशिम जिल्हातील मालेगाव येथे कुजलेल्या अवस्थेत पोत्यात बांधलेल्या मिळून आला अनोळखी महिलेचा मृत्यूदेह.

वाशिम जिल्हातील मालेगाव येथे कुजलेल्या अवस्थेत पोत्यात बांधलेल्या मिळून आला अनोळखी महिलेचा मृत्यूदेह.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In