✒️ आकाश पांचाळ, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- सिंघम अशी ख्याती असलेले सुनील जयसिंग तांबे यांनी २४ जून २०१८ रोजी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता आणि २ ते ३ महिन्यात च गुन्हेगारी साठी प्रसिध्द असलेलं हडपसर अगदी सुतासारखं सरळ केलं होतं आणि खाकी वर्दीची काय दहशत असते हे दाखवलं होतं.
आज पुणे सह हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. त्यात चोरी, मर्डर, डकेती फसवणूक, महिला अत्याचार त्यावर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी सुनील जयसिंग तांबे यांच्या वर आहे.
याअगोदर हडपसर मध्ये वरिष्ठ निरीक्षक म्हणून सुनील जयसिंग तांबे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या सर्व तथाकथित गुंड, भाई यांच्यावर चांगलीच जरब बसवली होती. आपल्या १ वर्षाच्या कार्यकाळात जवळ जवळ ८०% गुन्हेगारी त्यांनी शांत केली होती. जून २०१९ मध्ये त्यांची बदली झाली होती. पण सुनिल तांबे आता पुन्हा हडपसरचा कारभार स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहे.

