उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एक खळबजनक माहिती समोर आली आहे. येथे आर्थिक वादातून एका महिलेचे अपहरण करून बेदम मारहाण करीत दीड कोटींची खंडणी मागण्याचा प्रकार मध्यरात्री घडला. ही घटना समोर येतात संपूर्ण जिल्हात एकच खळबळ उडाली. पोलीसांनी या प्रकरणी सर्व 11 संशयितांना अटक केली असून न्यायालयाने या सर्वांना ३० मे अखेर पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अभिजित पाटील वय 30 वर्ष, श्रीकांत कोकळे वय 40 वर्ष, आणि विशाल शिंदे वय 39 वर्ष हे तिघांनी आठ जणांना घेउन बुधवारी रात्री साडेआठ वाजणेच्या सुमारास आम्ही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस असल्याचे सांगत संजोग कॉलनीतील नंदादिप बंगल्यात शिरले. या ठिकाणी येउन स्वाती संजय पाटील वय 58 वर्ष यांच्याशी आर्थिक कारणावरून वाद घातला. यानंतर महिलेला मोटारीतून घेउन मिरज येथे नेले. त्या महिलेला मिरज येथे नेल्या नंतर बेदम मारहाण करण्यात आली. तसेच महिलेची सुटका करण्यासाठी दीड कोटींची खंडणीही मागण्यात आली. या प्रकरणी शिवराज पाटील यांनी गुरूवारी पहाटे शहर पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी अभिजित दिलीप पाटील रा. तासगाव, श्रीकांत शिवाजी कोकळे रा. उमदी, ता. जत, विशाल गोविंद शिंदे रा. कासार गल्ली, तासगाव, अतुल अशोक काळे वय 29 वर्ष, रा. गणपती पेठ, सांगली, अमर गोरख खोत वय 36 वर्ष रा. संजयनगर सांगली, श्रीकांत आप्पासो गायकवाड वय 30 वर्ष रा. तासगाव, मनोज नारायण चव्हाण वय 32 वर्ष रा. कोल्हापूर रोड, सांगली, सुशांत नंदकुमार पैलवान वय 32 वर्ष रा. तासगाव, सुयोगराज चंद्रकांत वेल्लार वय 37 वर्ष रा. स्टँडजवळ, सांगली, आरीफमहमद बाबासाहेब आत्तार वय 38 वर्ष, रा. शाहुनगर जयसिंगपूर, शीतल गोरख भजबळे वय 39 वर्ष, रा. संजयनगर सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी सर्व संशयितांना गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार MH 10 DG 4302 स्कोडा MH 08 Z 3838 जप्त केली आहे. यात वापरलेली आणखी एक एमजी हेक्टर कारचा शोध पोलीस घेत आहेत. सांगली शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मागर्दशर्नाखाली सहायक निरीक्षक समीर ढोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितामध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याचा स्वीय सहायक म्हणून गेल्या वर्षापर्यंत कार्यरत होता, तर दोघे जण शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्व 11 संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे निरीक्षक श्री. गायकवाड यांनी सांगितले.

