Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुख्यमंत्री (सीएमओ) कार्यालयाच्या नावाने शैक्षणिक संस्थांची फसवणूक करणारा, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ४ ने ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 27, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुख्यमंत्री (सीएमओ) कार्यालयाच्या नावाने शैक्षणिक संस्थांची फसवणूक करणारा, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ४ ने ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, ता. २६:- आज कोण कोणाची कशा प्रकारे फसवणूक करेल हे सांगता येत नाही. अशीच एक फसवणुकीची घटना पिंपरी चिंचवड येथून समोर आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत नामांकित शिक्षण संस्थांत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून देत पालकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत पुणे, हिंजवडी, लवळे आणि बेंगलोर येथील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये त्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिले आहे. राहुल राजेंद्र पालांडे वय ३० वर्ष रा. दर्शन नगरी केशवनगर चिंचवड असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. सोमवार (ता.२९) मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.

हॅलो, मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय, तुमच्या महाविद्यालयात आमचा एक प्रवेश करून द्या, असे फोन पुणे शहरातील काही महाविद्यालयात गेले. मग मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर काम तर होणारच..फोन करणाऱ्या व्यक्तीने पुणे शहर अन् परिसरातीलच नाही तर बंगळूरमधील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना या पद्धतीने प्रवेश मिळवून दिले. मग हे प्रवेश मिळवण्यासाठी त्यांच्यांकडून पैसे घेतले. पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरातील हिंजवडी, लवळे, पुणे आणि बंगळूर येथे सिंबायोसिस आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये चार ॲडमिशन मिळवून देण्यासाठी त्या व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवले अन् विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (ता. २१) मे रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिंजवडी पोलीस ठाणे येथील फिर्याद देण्यात आली होती की, राहुल राजेंद्र पालांडे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी नाही. तसेच तो महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही विभागात कोणत्याही पदावर कर्तव्यावर सुद्धा नाही. तरीसुद्धा त्याने सीएमओ कार्यालयातून बोलत आहे असे बोलत आहे असे फोन द्वारे सांगत पुणे, हिंजवडी, लवळे आणि बेंगलोर येथील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करून घेतले. लोकांचा विश्वास संपादन करण्याकरिता तो महाराष्ट्र शासनाची बोधचिन्ह आपल्या मोबाईलचे ट्रू कॉलरच्या प्रोफाईलवर तसेच व्हाट्सअप डीपीवर बोधचिन्ह ठेवत होता. त्याच्याखाली सीएमओ ऑफिस, महाराष्ट्र शासन मुंबई मंत्रालय अशी प्रोफाइल बनवून व्हाट्सअपचे स्लोगन मध्ये सीएमओ पीआरओ ऑफिस एकनाथ शिंदे, मुंबई मंत्रालय, महाराष्ट्र शासन मजकूर ठेवला होता. तसेच त्याखाली गुगल लोकेशन व बनावट ई मेल आयडी ठेवला होता. राहुल पालांडे हा महाराष्ट्र शासनाचा कोणताही लोकसेवक नसताना लोकसेवक असल्याची बतावणी करून तो लोकसेवक वापरतो तसे ओळखपत्र वापरून शासनाचे लौकिकस बाधा आणण्याकरता सदर बोधचिन्हाचा वापर करून त्याद्वारे विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी सदर बोधचिन्ह चिन्हाचा व बनावट नावाचा वापर करून दबाव आणून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये ऍडमिशन मिळून दिले आहे. म्हणून त्याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर बाब ही गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी गुन्हे शाखा युनिट ४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांना या संदर्भात तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून त्याला तत्काळ शिताफिने अटक केले. न्यायालयाने त्याला सोमवारी (ता. २९) पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाच्या पुढील तपास पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ४चे पथक करीत आहे.

Previous Post

सांगलीत रात्री महिलेचे अपहरण, मग दीड कोटी खंडणीची मागणी… 11 आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

शासनाच्या नवीन रेती धोरणानुसार नागरीकांना स्वस्त दरात रेती मिळावी या करीता हिंगणघाट तालुक्यात तीन ठिकाणी रेती डेपो तयार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शासनाच्या नवीन रेती धोरणानुसार नागरीकांना स्वस्त दरात रेती मिळावी या करीता हिंगणघाट तालुक्यात तीन ठिकाणी रेती डेपो तयार.

शासनाच्या नवीन रेती धोरणानुसार नागरीकांना स्वस्त दरात रेती मिळावी या करीता हिंगणघाट तालुक्यात तीन ठिकाणी रेती डेपो तयार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In